जीवनशैलीव्यवसाय

‘सह्याद्रि’कडून सन 2025-26 हंगामातील ऊस बिलाची संपूर्ण रक्कम 304 कोटी 9 लाख रूपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग

‘सह्याद्रि’कडून सन 2025-26 हंगामातील ऊस बिलाची संपूर्ण रक्कम 304 कोटी 9 लाख रूपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
यशवंतनगर ता.कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सन 2025-26 गळीत हंगामात कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसास प्रति मे.टन 3500/- प्रमाणे ऊस बिलाची संपूर्ण रक्कम रूपये 304 कोटी 9 लाख, ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
सह्याद्रिने नेहमीच रास्त व उच्च दराची परंपरा जोपासली आहे. कारखान्याने सन 2025-26 गळीत हंगामात 8 लाख 68 हजार 831 मे.टन ऊसाचे गाळप केले आहे, या संपूर्ण ऊसाची प्रति मे.टन 3500/- प्रमाणे ऊस बिलाची संपूर्ण रक्कम रूपये 304 कोटी 9 लाख ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत.
तसेच प्रतिदिन 7500 मे.टनावरून 11000 मे.टन विस्तारवाढ प्रकल्प यशस्विरित्या कार्यान्वित केलेला असून, येत्या सन 2026-27 गळीत हंगामात नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी आवश्यक ती ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उभारणीचे काम सुरू आहे, येणार्या हंगामात प्रतिदिन 11000 व त्याहीपेक्षा जास्त ऊस गळीत करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने सुरू आहे. ऊस उत्पादकांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस ‘सह्याद्रि’कडेच गळीतास पाठवावा असे आवाहन कारखाना प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »