शेकाप बळीराजा शेतकरी संघटना रासप यशवंत संघटना यांनी संयुक्तपणे ऊस दर संदर्भात तहसीलदारांना निवेदन ऊसाला 5500 दर न मिळाल्यास चक्काजाम करण्याचा इशारा

शेकाप बळीराजा शेतकरी संघटना रासप यशवंत संघटना यांनी संयुक्तपणे ऊस दर संदर्भात तहसीलदारांना निवेदन
ऊसाला 5500 दर न मिळाल्यास चक्काजाम करण्याचा इशारा
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
ऊसाला एकरी साडेपाच हजार रुपये भाव मिळावा अन्यथा तांबवे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन, रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी ठीक चार वाजता करण्यात येईल, असा इशारा सर्व शेतकरी संघटनांनी मिळून तहसीलदार यांना दिला.
यावेळी अँड भाई समीर देसाई शेकाप जिल्हाध्यक्ष म्हणाले की यावर्षी दुष्काळ पडल्यामुळे ऊसाला टनेज नाही व रिकवरी कमी आहे, तरीही सरकारने लवकर साखर कारखाने का सुरू करायची घाई केली आहे?.
यावर्षी उत्पन्नाचा खर्चही वाढलेला आहे खते नांगरट वगैरे उत्पादन खर्च यावर्षी दुप्पट झाला आहे.मागील वर्षी साखरेला दर 40 रुपये किलो होता, यावर्षी रिटेल बाजारात साखरेला दर ७० रुपये किलो आहे ,त्यामुळे यावर्षी ऊसाला साडेपाच हजार रुपये प्रति टन दर मिळावा अशी मागणी आपल्या भाषणात केली.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव म्हणाले
सरकारने दुष्काळजन्य परिस्थिती कारण पुढे करत कारखाने नोव्हेंबर च्या ऐवजी ऑक्टोबर मध्येच सुरू केले आहेत, कोणत्याही शेतकरी संघटनेची चर्चा बैठक न करता कारखाने सुरू केले आहेत, कोणत्याही साखर कारखान्याने दर जाहीर केले नाहीत व ऊस तोडणी सुरू केली आहे ,बाजारात साखरेचे दर वाढले आहेत, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे, त्यामुळे यावर्षी पाच हजार पाचशे दर जाहीर करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. यावेळी उपस्थित
रा स पा जिल्हा कार्याध्यक्ष
महेश जिरंगे, शिवाजीराव पाटील( सुपणेकर), ॲड भाई हैबतराव पवार, अँड अमित लाड ,संदीप साळुंखे, सुनील कोळी, सर्जेराव थोरात प्रल्हाद माने, भाई विक्रम पाटील शेकाप रासप बळीराजा व यशवंत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






