जीवनशैली

भाजपा पिंपरी चिंचवड प्रभारीपदी भरत पाटील यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले अभिनंदन

भाजपा पिंपरी चिंचवड प्रभारीपदी भरत पाटील यांची नियुक्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले अभिनंदन
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक (भारत सरकार ) ऍड भरत पाटील यांची भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पिंपरी चिंचवड ( पुणे जिल्हा) प्रभारीपदी निवड जाहीर केली असून या निवडीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ऍड भरत पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
भरत पाटील हे गेले 30 वर्षे होऊन अधिक काळ भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत त्यांनी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून अत्यंत चांगले काम केले आहे भरत पाटील हे सध्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक (भारत सरकार ) म्हणून काम करीत असून भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर गुजरात राजस्थान गोवा दिल्ली येथील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती ही जबाबदारी भरत पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने व कार्यकर्त्याने पूर्ण केल्यामुळे पक्षाने आता त्यांच्यावर पिंपरी चिंचवड प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे.
पिंपरी चिंचवड येथील संघटनात्मक पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे मत ऍड. भरत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »