जीवनशैली

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची शनिवारी विंगमध्ये प्रचारसभा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची शनिवारी विंगमध्ये प्रचारसभा
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा होणार शुभारंभ
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
सातारा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ विंग (ता. कराड) येथे शनिवारी (ता. २७) सायंकाळी ६ वाजता प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार आहेत.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दि. २७ एप्रिल रोजी विंग येथे सायंकाळी ६ वाजता चावडी चौकात हनुमान मंदिरासमोरील पटांगण येथे आयोजित केला आहे. सभेला सातारा लोकसभा महायुतीचे उमेदवार खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश पाटील – वाठारकर, राजाभाऊ पाटील – उंडाळकर, जितेंद्र डुबल, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, शिवसेना नेते अक्षय मोहिते, काकासाहेब जाधव, सुलोचना पवार, दलित महासंघाचे नेते मच्छिंद्र सकटे, आरपीआयचे नेते आप्पासाहेब गायकवाड, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी तसेच महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. तरी लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा कराड दक्षिण मंडल अध्यक्ष धनाजी पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »