मस्जीद मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी मस्जीद परिचय या अत्यंत अभिनव अश्या कार्यक्रमाचे आयोजन

सर्व धर्मियासाठी मस्जीद परीचय कार्यकमाचे आयोजन
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
सांप्रदायिक सदभावना जोपासण्याचा एक भाग म्हणुन आज दिनांक ३/३/२०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत कसबे कराड पेठ गुरूवार येथिल सर्वात जुन्या व ऐतिहासिक अश्या जामा मस्जीद मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी मस्जीद परिचय या अत्यंत अभिनव अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यकमात अजानचा अर्थ,मस्जीद चे सामाजिक महत्व, तिथे कश्या पध्दतीने पार्थना केली जाते. त्याचे आध्यात्मिक व आरोग्यदष्टया महत्व, मस्जीद च्या विविध भागाची माहिती आणि त्यांचे महत्व, मस्जीद मध्ये स्त्रियांसाठी बंदी आहे किंवा नाही या बाबतचे मत इ. माहिती देण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणुन इस्लामचे अभ्यासक मा. इंजिनिअर इम्तियाज शेख, मा. इंजिनिअर मंजुर खान व इंजिनीअर अब्दुल वाजीद कादरी आवर्जुन उपस्थित होते. सदर कार्यक्रमात येणा-या प्रत्येक व्यक्तीना सर्व माहिती देणे, शंका निरसन करणे आदि कार्य वरील लोकांनी केली.
मस्जिद परिचयाचे कार्यक्रमामध्ये शेकडो लोकांनी भेट दिली व त्यांनी समाधान व्यक्त केले सदर लोकांनी मस्जीद बददल चे आमचे गैरसमज दूर झाले असुन मस्जीदीबदल आमच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे कार्यक्रम गावा गावांत आयोजित करून मस्जीद बददल ची माहिती दिली पाहिजे असे सांगुन आयोजकाचे अभिनंदण केले. आज स्वार्थाकरीता लॉकमध्ये काही लोक धुव्रीकरण करत आहे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मस्जिद परिचय कार्यकमामंध्ये आहेत. असे मत व्यक्त केले गेले.
या कार्यक्रमामध्ये इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट मुंबई यांच्याकडुन मा. खासदार श्रिनिवासजी पाटील मा.आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सहा खंडामध्ये स्पष्टीकरणासह कुराण प्रकाशन करण्यात आले. यावेळी मा. खासदार ब्रिनिवासजी पाटील यांनी सदर कार्यक्रमास माझ्या शुभेच्छा असल्याचे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास मा. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक सौरभ पाटील, सुरेश पाटील, गोटे गावचे उपसरपंच अमित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गरजे पोलीस निरीक्षक के.एन पाटील, नगरसेवक हणमंतराव पवार, पोपटराव सांळुखे, इंद्रजित चव्हाण, दादा शिंगन, सागर बर्गे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, भुषन पाटील संभाजी ब्रिगेड यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जामा मस्जीद कराड चे अध्यक्ष हाजी अल्ताफभाई शिकलगार, हारूण तांबोळी, इम्रान मुल्ला, नदीम सिदीकी, सैफुल्लाह खैरतखान, रमजान कागदी, सल्लाउददीन मुश्रीफ, सचिव मन्सुर तांबोळी जावेद मुल्ला, नवाज पन्हाळकर आदी लोकांनी परिश्रम घेतले.






