वारुंजी सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंत पाटील बिनविरोध नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवड; दोन स्वीकृत संचालकांचीही नियुक्ती

वारुंजी सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंत पाटील बिनविरोध
नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवड; दोन स्वीकृत संचालकांचीही नियुक्ती
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
वारुंजी (ता. कराड) येथील विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंत विश्वनाथ पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तसेच अर्जुन जोतीराम पाटील आणि हणमंत पांडुरंग पाटील यांची स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन व संचालक बाळासाहेब काशिनाथ पाटील, मुकुंद काशिनाथ पाटील, विक्रम चव्हाण, विजयकुमार पाटील, सुरेश पवार, गणेश पाटील, धनंजय पाटील, आनंदराव पाटील, सुनंदा धुमाळ, सुमन पाटील, आनंदराव थोरवडे, दीपक भंडलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.






