कोपर्डे हवेलीतील मारुती चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह पक्षप्रवेश

कोपर्डे हवेलीतील मारुती चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह पक्षप्रवेश
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कोपर्डे हवेली येथील युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते मारुती चव्हाण उर्फ सोन्या काका यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उंब्रज येथील भाजप कार्यालयात आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
आमदार घोरपडे यांनी, मारुती चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. कोपर्डे हवेली परिसरातील पाणी, रस्ते आणि रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन परिसराच्या विकासासाठी काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मारुती चव्हाण यांनी, आमदार मनोज घोरपडे यांच्या विकासाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामामुळे आपण प्रभावित झालो असून, समर्थकांसह पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सचिन चव्हाण, वैभव चव्हाण, युवराज चव्हाण, शिवाजी मिस्त्री, जितेंद्र चव्हाण, अविनाश लोहार यांच्यासह शैलेश चव्हाण, जलिंदर चव्हाण, महेश चव्हाण, मोहन चव्हाण, अमोल पवार, दादा चव्हाण, शिवाजी चव्हाण, विद्याधर चव्हाण, कैलास चव्हाण, सतीश चव्हाण, नितीन चव्हाण, शशिकांत चव्हाण, कृष्ण चव्हाण, विजय चव्हाण, सागर चव्हाण, रामचंद्र चव्हाण, संतोष चव्हाण, गणेश चव्हाण, प्रमोद चव्हाण व विवेक चव्हाण उपस्थित होते.






