जीवनशैली

रामकृष्ण वेताळ यांच्याकडे पूर्व कोल्हापूरची धुरा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदानंतर मोठी जबाबदारी; संघटन कौशल्यावर पक्ष नेतृत्वाचा विश्वास

रामकृष्ण वेताळ यांच्याकडे पूर्व कोल्हापूरची धुरा
किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदानंतर मोठी जबाबदारी; संघटन कौशल्यावर पक्ष नेतृत्वाचा विश्वास
कराड :ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
भारतीय जनता पक्षाने संघटन बळकटीसाठी पावले उचलत रामकृष्ण श्रीमंत वेताळ यांच्याकडे कोल्हापूर पूर्व अर्थात हातकणंगले मतदारसंघाची प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. अल्पावधीतच त्यांच्यावर सोपवण्यात आलेली ही दुसरी मोठी जबाबदारी असल्याने पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला विश्वास अधोरेखित झाला आहे.
भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्यानंतर वेताळ यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत पक्षाने त्यांना थेट महत्त्वाच्या मतदारसंघाची धुरा दिली आहे. ग्रामीण भागात मजबूत पकड, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि संघटन उभारणीतील त्यांची वेगळी शैली यांमुळे त्यांची निवड झाल्याचे पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत वेताळ यांनी पक्ष संघटन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे, युवकांमध्ये सक्रियता निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर नेतृत्व घडवणे, ही त्यांची खास ओळख मानली जाते. त्यामुळेच हातकणंगलेसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
विशेषतः ग्रामीण व वाढीव वस्ती भागात भाजपची घडी बसवण्यासाठी वेताळ यांनी प्राथमिक स्तरावर नियोजन सुरू केल्याची माहिती आहे. आगामी काळात बूथस्तरावर संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर असणार असल्याचे समजते.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे पक्षातील वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वेताळ यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले मतदारसंघात भाजपाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »