
संभाजी नगर येथे होणाऱ्या फ्रिस्टाईल,ग्रीको रोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी कोरेगाव येथे निवड चाचणीचे आयोजन
कराड: प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने
दि 18 व 19 डिसेंबर रोजी संभाजी नगर येथे होणाऱ्या 17 वर्षाखालील फ्रिस्टाईल (कुमार गट ) व 17 वर्षाखालील ग्रीको रोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघाची निवड चाचणी, रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी D.P. भोसले महाविद्यालय कोरेगाव या ठिकाणी होत आहे.
स्पर्धेसाठी 17 वर्ष वयोगटासाठी 2008 व 2009 चा जन्म असावा.
वजन गट :- 45 kg, 48kg,51 kg,55 kg,60 kg,65kg, 71kg,80kg,92kg,110kg
वजन रविवार दिनांक 14 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत होतील.
12 वाजता स्पर्धेला सुरवात होईल
दोन कुस्ती मॅट असल्यामुळे स्पर्धा एका दिवसात संपणार आहे.
अधिक माहिती साठी संपर्क :-
कोरेगाव तालुका कुस्तीगीर संघ
पै पिंटू भाऊ फाळके -9422600088
पै विनोद भाऊ शेलार -8108164416
पै दिग्विजय जगदाळे -9552267734
कोरेगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदा च अशा स्पर्धेचे नियोजन होत आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक नवोदित मल्ल या स्पर्धेत भाग घेणार आहेत. आणि लगेच राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळे स्पर्धेत चुरश निर्माण होणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी
फ्रिस्टाईल व ग्रीकोरोमन या दोन्ही संघाची निवड करण्यात येणार असल्याचे
मा.महाराष्ट्र केसरी बापू (दादा ) लोखंडे
आध्यक्ष – जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा
मा. पै धनंजय पाटील(काका)आटकेकर
सरचिटणीस जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा यांनी सांगितले आहे.






