आरोग्य

सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राला सात डायलिसिस मशिन्सची भेट

सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राला सात डायलिसिस मशिन्सची भेट
सातारा : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र आणि सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत आरोग्यसेवा उपक्रमाला रोटरी चेन्नई लेजेंड्स, रोटरी मद्रास आणि होडेक लिमिटेड यांच्यावतीने सात डायलिसिस मशीन्स देणगी स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. पुण्यातील सिंबायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) च्या लवळे परिसरातील रुग्णालयाच्या डायलिसिस केंद्रात या मशीन्स औपचारिकरीत्या सुपूर्द करण्यात आल्या. या उपक्रमामुळे आवश्यक मूत्रपिंड उपचारसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
या सात नवीन मशीन्सच्या समावेशामुळे सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्रामधील डायलिसिस मशीन्सची एकूण संख्या 32 झाली आहे. त्यामुळे नियमित डायलिसिसची आवश्यकता असलेल्या रुग्णांना सेवा देण्याची रुग्णालयाची क्षमता वाढणार आहे.
सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे डायलिसिस सेंटर आठवड्याचे सातही दिवस, चोवीस तास कार्यरत असते. या सेंटरमध्ये दररोज सुमारे ७० ते ९० डायलिसिस केले जातात, तर दर महिन्याला सुमारे २ हजार डायलिसिस पार पडतात.
या समारंभाला रोटरी इंटरनॅशनलचे पीआरआयडी डॉ. महेश कोटबागी, सिंबायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) चे संस्थापक व अध्यक्ष प्रा.डॉ. एस.बी.मुजुमदार तसेच सिंबायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय आणि सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र चे अधिष्ठाता एअर कमोडोर डॉ. व्ही. के. सशिंद्रन (निवृत्त) उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »