
आदिती मधुकर जाधव हिला राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक
नागपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न: सर्व स्तरातून कौतुक
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
सरस्वती विद्यामंदिर कराड यांची विद्यार्थिनी कुमारी आदिती मधुकर जाधव हिने नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा यामध्ये सुवर्णपदक मिळवून शाळेचे नाव उंचविले या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे , यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर या ठिकाणी दिनांक 21 पासून पिस्टल व रायफल या स्पर्धा सुरू झाल्या आहेत या ठिकाणी कुमारी आदितीने दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात 19 वर्षे वयोगटांमध्ये सुवर्णपदक मिळवून तिने कराड शहर तसेच सातारा जिल्ह्याचे नाव उंचाविले मागील पंधरा दिवसांमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धा व त्यानंतर विभागीय स्पर्धा यामध्ये सुवर्णपदकाची कमाई कायम ठेवत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून जिल्ह्याचे वर्चस्व ठेवले याबद्दल तिचे शाळेच्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व पालक यांचेकडून खूप कौतुक केले जात आहे.






