जीवनशैलीव्यवसाय

श्री मळाई देवी पतसंस्थेचा सर्वाधिक 10% लाभांश

श्री मळाई देवी पतसंस्थेचा सर्वाधिक 10% लाभांश
कराड: ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेने सन 2025 – 26 सालासाठी 10% लाभांश देणे यापूर्वी जाहीर केलेले आहे. सदर लाभांश वाटप शुभारंभ संस्थेचे चेअरमन मा. श्री अजित थोरात यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेला 40 वर्षे पूर्ण झाली गेल्या 39 वर्षात दरवर्षी सातत्याने सभासदांना लाभांश देणारी मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ ,अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संस्थेचे कामकाज उत्तम प्रकारे चालवले असून शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे. संस्थेने दरवर्षी 10% लाभांश दिलेला आहे. श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह एकूण 22 शाखा कार्यरत असून एकूण 79 सेवक आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत असून बँकिंग प्रणाली लागू केलेली आहे. संस्थेने सभासदांना किंवा QR कोड ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. संस्थेच्या एकूण 22 शाखा पैकी 17 शाखा स्व मालिकेच्या मालकीच्या इमारतीत आहेत. यावर्षी ही सेवकांना पगारवाढ व बोनस ही देण्यात येणार आहे तसेच कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन सभासद व ग्राहकांना तत्पर व विनम्र सेवा दिली जात आहे. श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेचा एकूण व्यवसाय 333.23 कोटीचा असून ठेवी 187.78 कोटी व कर्ज 145.45 कोटी वाटप करून संस्थेने आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. संस्थेचे लेखापरीक्षक मे.के. एल. सावंत यांच्याकडून लेखापरीक्षण करून घेऊन वरचेवर त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. तसेच उपनिबंधक सहकारी संस्था कराडच्या उपनिबंधकसो श्रीमती अपर्णा यादव मॅडम व त्यांचे सर्व अधिकारी यांचे सातत्याने मार्गदर्शन घेण्यात येते.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना त्या म्हणाल्या की सहकार खात्याचे सर्व निकष मानांकाची पूर्तता प्रत्येक वर्षी संस्था करते यावर्षी सुद्धा नवीन गुण तक्त्यातील निकषाची पूर्तता संस्थेने पूर्ण केली आहे, याचे श्रेय संस्थेचे चेअरमन व्हा. चेअरमन संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, सभासद, ठेवीदार, कर्जदार तसेच सेवकांना दिले जाते या सहकार्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अशोकराव थोरात (भाऊ) यांनी त्यांचे आभार मानले. संस्थेने 70.56 कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली आहे. संस्थेचे भाग भांडवल 12 कोटी 69 लाख असून संस्थेने 17 कोटी 13 लाख पेक्षा जास्त रकमेचे राखीव व इतर निधी संस्थेने उभा केलेला आहे. संचालक मंडळाने व्यवसाय व्यवस्थापनाचे वेळप्रसंगी सहकार खात्याच्या बदलत्या धोरणानुसार लवचिकता ठेवून धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सभासदांना दिवाळीनिमित्त लाभांश वाटपास शुभारंभ करण्यात आला संस्थेचे चेअरमन मा. श्री अजित थोरात यांनी लाभांश सभासदांच्या सेविंग खात्यावर जमा केला आहे असे जाहीर केले. कार्यक्रमाच्या वेळी व्हा. चेअरमन चंद्रकांत टंकसाळे सर्व संचालक, सल्लागार, संस्थेचे सचिव सर्जेराव शिंदे सेवक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संस्थेचे संचालक श्री भीमाशंकर माऊर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »