समन्वयातून चांगले काम होते : मीना साळुंखे

समन्वयातून चांगले काम होते : मीना साळुंखे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल मीना साळुंखे यांचा पंचायत समिती कराडचेअधिकारी कर्मचाऱ्यांकडून गौरव
कराड : प्रतिनिधी –
अधिकारी पदाचे काम करीत असताना चांगला समन्वय ठेवून काम केल्यास चांगली कामे होऊ शकतात हा माझा सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण या दुर्गम तालुक्यातील साडेचार वर्षाच्या कामाचा अनुभव राहिला आहे, असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) मीना साळुंखे यांनी केले.
मीना साळुंखे यांची गटविकास अधिकारी वर्ग १पदावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) पदावर पदोन्नतीने चंद्रपूर जिल्ह्यात बदली झाली आहे यानिमित्त कराड पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी व कराड तालुक्यातील ग्रामसेवक/ ग्रामसेवक संघटना यांनी श्रीमती साळुंखे यांचा पदोन्नती बद्दल सत्कार व शुभेच्छा समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी विजय विभुते, तालुका पशुसंवर्धन अधिकारी चव्हाण, गट शिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, कृषी अधिकारी संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मीना साळुंखे म्हणाल्या, पाटण हा दुर्गम तालुका आणि कराड हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि जागरूक असलेला तालुका म्हणून ओळखला जातो या पार्श्वभूमीवर एक महिला अधिकारी म्हणून मी यशस्वी होणेचे दृष्टीने यशस्वी काम करण्याचे ध्येय ठेवून सर्वांशी सुसंवाद व समन्वय साधत काम करत गेले. यामुळेच दोन्ही तालुक्यातील विविध विषयांचे काम राज्य नव्हे तर देशपातळीपर्यंत दखलपात्र ठरले.विशेष करून कराड तालुक्यातील घरकुल प्रश्न निर्गती व पूर्णत्व तसेच महिला बचत गट यांची जत्रा कार्यक्रम याची केंद्र सरकारने दखल घेतली,बांबु लागवड मध्ये आघाडी या यशात मला साथ देणाऱ्या माझ्या सर्व विभाग प्रमुख,क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी व कार्यायीन सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. आपल्या तालुक्यातील कामाचा जिल्हास्तरावर किंवा विभाग राज्य स्तरावर कौतुक होते त्यावेळी आपण नेतृत्व करत असलेल्या टीमचे खूप कौतुक वाटते आणि असे कौतुक वाटण्याची संधी सातारा जिल्ह्यातील या साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये मला अनेकदा पाटण व कराड तालुक्यात मिळाली . प्रभारी गट विकास अधिकारी वर्ग १ विजय विभुते म्हणाले, प्रशासनात उच्च पदावर काम करत असताना महिला आणि पुरुष असा काहीच भेदभाव नसतो. महिला असो अथवा पुरुष असो दोघांनाही तितक्याच जबाबदारीने काम करावे लागते. आणि ही जबाबदारी साळुंखे मॅडम यांनी सक्षमपणे पार पडली त्यामुळेच आज त्यांचा सर्व सहकाऱ्यांकडून गौरव होत आहे.
प्रशासन अधिकारी एम् बी राजमाने म्हणाले, प्रशासनात अधिकारी म्हणून कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांचे कडून काम करून घेताना अधिकारी कर्मचारी काम करताना तणावमुक्त करतील या बाबत विशेष लक्ष देणारे आदर्शवत अधिकारी म्हणून साळुंखे मॅडम यांची आठवण कायम राहील या मुळे कराड तालुक्यातील अधिकारी कर्मचारी कामात यशस्वी झाले व अनारोग्यातून मुक्त राहिले यामध्ये साळुंखे मॅडम यांचे महत्त्वपूर्ण एक प्रकारे योगदान आहे
गट शिक्षणाधिकारी सन्मती देशमाने मनोगत व्यक्त करताना म्हणाले साळुंखे मॅडम यांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेऊन काम करून घेतले ,पशुसवर्धन विकास अधिकारी डॉ चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती जमीला मुलाणी, सहायक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रतिभा लोंढे,सांख्यिकी अधिकारी श्री सागर बोलके, कृषी अधिकारी श्री संतोष जाधव या सर्वांनी साळुंखे मॅडम याचे काम करून घेण्याचे शैलीमुळे आपआपले विभाग कामात आघाडीवर राहिले याचे विवेचन केले व साळुंखे मॅडम याचे व्यक्तिगत मार्गदर्शन कसे लाभले या बाबत मनोगत व्यक्त केले ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले म्हणाले ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी हे एकसंघ राहून काम करतील हे पाहून व येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करून वेळोवेळी प्रोत्साहन देऊन तालुक्यातील ग्रामपंचायती कामात आघाडीवर राहतील या बाबत विशेष दक्ष होत्या.
कार्यक्रमास पंचायत समिती कराडचे विभाग प्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, प्रशासन अधिकारी श्री मारुतीराव संकपाळ,श्री दीपक कराळे ,ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी, संघटनेचे प्रतिनिधी व वर्ग ३-४ चे कर्मचारी उपस्थित होते व साळुंखे मॅडम यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि आभार तालुका अभियान व्यवस्थापक निलेश पवार यांनी केले.






