पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे हस्ते माजी सहकार मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ : चेअरमन लक्ष्मण देसाई
पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे हस्ते माजी सहकार मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ : चेअरमन लक्ष्मण देसाई
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कोयना सहकारी दूध उत्पादक प्रक्रीया संघ मर्या., कराड या दूध संघाची स्थापना सन १९५७ साली सहकार महर्षी स्व. आर डी पाटील यांनी केली. सन १९८५ सालापासून महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाने कोयना उपपदार्थांची निर्मिती करून आपला नावलौकीक करून ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.
स्व. विलासकाकांच्या विचार व आचाराची या पुढील काळातही स्पूर्ती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोयना दूध संघाने संघाच्या प्रांगणात स्व. विलासकाकांचा पूर्णकृती पुतळा उभारला आहे. सदर पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवार दि. ६/९/२०२४ रोजी दुपारी ३ वाजता कोयना दूध संघाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे. या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे ४९ वे मठाधिपती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचे शुभहस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली तसेच माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, सातारा जिल्हा मध्य. बँकेचे अध्यक्ष, खासदार नितिन जाधव- पाटील, कोयना दूध संघाचे मार्गदर्शक व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. उदयसिंहदादा पाटील (उंडाळकर) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे असल्याची माहिती चेअरमन लक्ष्मण देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संचालक उपस्थित होते.
तरी या समारंभास विलासकाकाच्या विचारावर प्रेम करणारे तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे व रयत संघटनेतील कार्यकर्ते, कोयना दूध संघाचे दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक यांनी सदर समारंभास उपस्थित रहावे असे अवाहन अॅड. उदयसिंहदादा पाटील (उंडाळकर) व कोयना दूध संघाचे चेअरमन व सर्व संचालक मंडळाने केले आहे.