जीवनशैली

कराड दक्षिणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी साथ द्या : डॉ. अतुल भोसले कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांचा मेळावा उदंड उत्साहात संपन्न; भरपावसात मुंबईकरांची प्रचंड गर्दी

कराड दक्षिणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी साथ द्या : डॉ. अतुल भोसले
कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांचा मेळावा उदंड उत्साहात संपन्न; भरपावसात मुंबईकरांची प्रचंड गर्दी
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये विविध विकासकामांसाठी गेल्या अडीच वर्षांत तब्बल ७०० कोटींहून अधिक विकासनिधी आणला आहे. या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली असून, बहुतांशी प्रगतीपथावर आहेत. येत्या काळात कराड दक्षिणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी कटीबद्ध असून, यासाठी आपण सर्वांनी भक्कम साथ द्यावी. येत्या काळात आपल्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असून; तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली. कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते.
भाजपा कराड दक्षिणच्यावतीने नवी मुंबईतील गुजरात भवन सभागृहात कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन मेळाव्याचे उद्‌घाटन करण्यात आले. या मेळाव्याला भरपावसाही मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती.
याप्रसंगी मुंबईस्थित रहिवाशांशी संवाद साधताना डॉ. भोसले म्हणाले, अनेक वर्षांपूर्वी कामाच्या शोधात आपल्या भागातील अनेक ग्रामस्थ मुंबईला आले. त्याकाळी कुणाचेही पाठबळ नसताना त्यांनी मुंबईत कष्टाने जीवन जगून, स्वत:ची ओळख निर्माण केली. आपल्या या कष्टाळू वृत्तीला माझा सलाम आहे. मुंबईत स्थायिक झाला तरी आपण आपली गावाकडची नाळ तुटू दिलेली नाही. किंबहुना गावाकडच्या प्रत्येक अडचणीच्या काळात तुम्ही मदतीसाठी सदैव पुढे असता, ही दानशूरतेची भावना अतिशय मोलाची आहे.
भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात जवळपास ७०० कोटींचा विकास निधी आला आहे. दक्षिणमधील २२७ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांसाठी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ४५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तसेच वाकुर्डे योजनेसाठी सरकारला कायमस्वरुपी धोरण ठरविण्यासाठी भाग पाडून, कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून नियमित थकीत रक्कम भरण्याची व्यवस्था केल्याने त्याचा आपल्या भागातील लोकांना मोठा लाभ होत आहे.
कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आपल्या भागातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. येत्या काळातही हा प्रयत्न कायम ठेऊन; महिला, ज्येष्ठ नागरिक, युवकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या सर्वांनी मला भक्कम पाठबळ द्यावे, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सदस्य संपतराव शेवाळे म्हणाले, डॉ. अतुलबाबांनी कराड दक्षिणमधील गावागावात शासनाच्या माध्यमातून मोठा निधी आणून अनेक विकासकामे साकारली आहेत. शासनाच्या अनेक योजनांचा लाभ देण्यासाठी ते आपल्या भागात गावोगावी शिबीरे घेत आहेत. त्यामुळे अशा कार्यक्षम नेतृत्वाला यंदा विधानसभेत संधी देण्याची गरज आहे. तेव्हा आता डॉ. अतुलबाबांना आमदार करण्यासाठी आपण सर्व मुंबईकरांनी मनाशी खूणगाठ बांधून पूर्ण तयारीनिशी कामाला लागावे.
यावेळी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, म्हारुगडेवाडीचे उपसरपंच अजित म्हारुगडे, जगन्नाथ म्हारुगडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, संदीप देसाई, सुरेश वाघमारे, जयवंत माटेकर यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योजक पोपटराव पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे, भाजपाचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, पांडुरंग शेटे, मोनहराव नायकवडी, प्रकाश ताटे, राजेंद्र शेवाळे, विक्रम रेपाळ, किसनराव जाधव, एकनाथ कुंभार, चंद्रकांत बांदेकर, सुनील चाळके, अरविंद शेवाळे, गणेश चाळके, जगन्नाथ म्हारुगडे, सचिन देसाई, अमोल चव्हाण, रुपेश भावके, बाजीराव खबाले, मारुती शिंगण, संदीप दबडे, रघुनाथ करमळकर, सचिन जाधव, सुरेश माटेकर, विशाल थोरात, सचिन मोहिते, पैलवान उदय शेवाळे, शिवाजी येळवे, शेळकेवाडीच्या सपरंच सुनंदा शेळके यांच्यासह विविध मान्यवर व मुंबईस्थित रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय शेवाळे यांनी प्रास्तविक केले. पंकज पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »