शिक्षण

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडला डिप्लोमा इंजिनिअरींग प्रवेशासाठी अधिकृत फॅसिलीटी सेंटर म्हणून मान्यता

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडला डिप्लोमा इंजिनिअरींग प्रवेशासाठी अधिकृत फॅसिलीटी सेंटर म्हणून मान्यता
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांचेमार्फत डिप्लोमा इंजिनिअरींग सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. यासाठी संचालनालयाने अधिकृत फॅसिलीटी सेंटरची घोषणा केलेली आहे व श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडला प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी अधिकृत FC सेंटर म्हणून मान्यता दिलेली आहे. फॅसिलीटी सेंटरचा कोड 6475 हा आहे. सातारा जिल्हयामध्ये गेल्या 40 वर्षापासून वेगवेगळ्या तांत्रिक कोर्सेसचे शिक्षण देण्याची परंपरा यशवंत विद्यापीठ कराड संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडने जोपासलेली आहे.
डिप्लोमा इंजिनिअरींग प्रथम वर्ष प्रवेशासाठी संचालनालयाने दिलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 29 मे 2024 ते 25 जून 2024 पर्यंत रजिस्ट्रेशन करणे व रजिस्ट्रेशन अर्ज कर्फमेशन करणेसाठी अवधी दिलेला आहे. तरी डिप्लोमा इंजिनिअरींग प्रथम वर्ष कॅप फेरीमधून प्रवेशासाठी इच्छुक असणारे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व प्रवेश प्रक्रिया, वेळापत्रक व अन्य माहितीसाठी तंत्रनिकेतनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्यावतीने करणेत आलेले आहे.
पॉलिटेक्नीकनला AICTE, न्यु दिल्ली, महाराष्ट्र शासनाची मान्यता असून MSBTE संलग्नता प्राप्त आहे. तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा आर्किटेक्चर, सिव्हील, इलेक्ट्रीकल, कॉम्प्युटर व मेकॅनिकल इंजिनिअरींग हे कोर्सेस सुरु आहेत. डिप्लोमा आर्किटेक्चर अभ्यासक्रमास COA, न्यु दिल्ली यांचीही मान्यता आहे. पॉलिटेक्नीकमध्ये कॅप राउंडमधून प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाचे नियमाप्रमाणे स्कॉलरशीपची सोय उपलब्ध आहे तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना ही शासनाचे खात्याकडून अल्पसंख्यांक स्कॉलरशीप मिळते. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया माहितीसाठी तंत्रनिकेतनमध्ये संपर्क साधावा व आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने संस्थापक सेक्रेटरी श्री.बी.टी. किणीकर सर व प्राचार्य स्वागत सर यांनी केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »