शिक्षण

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडच्या 23 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडच्या 23 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
यशवंत विद्यापीठ कराड संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराड येथे दिनांक 18 मार्च 2024 रोजी जिल्हयातील डिप्लोमा इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, आर्किटेक्चर व सिव्हील इंजिनिअरींग तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी सदरहु मेळाव्यासाठी जिल्हयामधून सुमारे 250 विद्यार्थी हजर होते. यामधील एकूण 83 विद्यार्थ्यांची मे. कल्याणी फोर्ज, पुणे व बाबासाहेब इंडस्ट्रीज तासवडे या नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे. यामध्ये तंत्रनिकेतनमधील इलेक्ट्रीकल, आर्किटेक्चर व कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागातील एकूण 23 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
हा मेळावा यशस्वी करणेसाठी तंत्रनिकेतनचे प्लेसमेंट विभागप्रमुख गुजर सर, मेकॅनिकल डिपार्टमेंटचे विभागप्रमुख प्रा. डिंगणे सर व सर्व स्टाफ यांनी सहकार्य केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य स्वागत सर, संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी श्री.बी.टी. किणीकर व अध्यक्ष श्री. शिरीष किणीकर दादा यांनी केले आहे. यापुढेही अशा पध्दतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करणेचा व जास्तीत जास्त विद्यार्थी प्लेस होतील यासाठी प्रयत्न करणेचा मानस प्राचार्य स्वागत सर यांनी याप्रसंगी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »