श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलीटेक्निक येथे पूल कॅम्पस ड्राईव्हचे (रोजगार मेळावा) आयोजन
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
कराड येथील श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलीटेक्निक येथे दि.१८ मार्च २०२४ ला पूल कॅम्पस ड्राईव्हचे (रोजगार मेळावा) आयोजन केले आहे. पुण्यातील तसेच तासवडे MIDC मधील नामांकित कंपन्या यासाठी तंत्रनिकेतनला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. डिप्लोमा अंतिम वर्षात शिकत असलेले, डिप्लोमा पास असलेले आणि ITI पास असलेले मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि त्यासंबंधित शाखांचे सर्व विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र असतील. १८ मार्चला सकाळी १०:३० पासून नोंदणी प्रक्रिया कॉलेजमध्ये सुरु होईल.
डिप्लोमा शिक्षण प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध असून सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करावी आणि प्रेमलाताई चव्हाण पॉलीटेक्निकने नामांकित कंपन्यांबरोबर मिळून आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राईव्हला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन संस्थापक बी टी किणीकर सर आणि तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री स्वागत सर यांनी केले आहे.