नरेंद्र मोदींनी देशाला बळकटी मिळवून दिली : डॉ. अतुल भोसले
येरवळे येथे १० लाखांच्या विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात
नरेंद्र मोदींनी देशाला बळकटी मिळवून दिली : डॉ. अतुल भोसले
येरवळे येथे १० लाखांच्या विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने देशाला बळकटी मिळवून देणारे गौरवशाली नेतृत्व लाभले आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. येरवळे (ता. कराड) येथे विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून येरवळे गावातील रस्ते सुधारणा कामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या २५-१५ ग्रामविकास योजनेतून १० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून होणाऱ्या विकासकामाचे भूमिपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाला नरेंद्र मोदींच्या रुपाने दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. मोदींनी देशात सामाजिक सलोखा टिकविण्याचे काम करत, विकासाला गतिमान केले. सरकारच्या अनेक योजनांचा सामान्य नागरिकांना होत असून, सर्वसामान्य जनतेची उन्नती साधण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कराड दक्षिणसाठी भरघोस निधी प्राप्त होत असून, भविष्यातही जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सयाजी यादव, माजी पं. स. सदस्या सौ. नंदाताई यादव, सरपंच रुपाली यादव, माजी सरपंच गीतांजली यादव, सेवा सोसायटीचे संचालक बाबासो यादव, वसंत यादव, रामभाऊ लोकरे, काजल चव्हाण, कविता यादव, सुवर्णा यादव, सुनील यादव, डॉ. आनंदराव लोकरे, कैलास यादव, भरत यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.