आनंदराव चव्हाण विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम उत्साहात
कराड:ग्राम दौलत न्युज नेटवर्क–
मलकापूर, ता. कराड येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुजाता भालेराव होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना एस.एस.सी. परीक्षेत उत्तम यश कसे संपादन करावे, अभ्यासाच्या चांगल्या सवयी कशा असाव्यात, याबद्दल मार्गदर्शन केले.
संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांनी सर्वांनी यशस्वी व्हा, असा शुभाशीर्वाद देवून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी कृतज्ञता म्हणून शाळेसाठी भेटवस्तू व रोख रक्कम दिली.
कार्यक्रमासाठी मलकापूर पालिकेचे विरोधी पक्ष नेते अजित थोरात, संस्थेचे अध्यक्ष पी.जी. पाटील, उपाध्यक्ष बी.बी. पाटील, संचालक वसंतराव चव्हाण, प्रा. संजय थोरात, संचालिका डॉ. स्वाती थोरात, खजिनदार तुळशीराम शिर्के, पालक प्रतिनिधी, सर्व शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.