जीवनशैलीमनोरंजन

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे संगीतमय नृत्याद्वारे दर्शन

कृष्णा महोत्सवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे संगीतमय नृत्याद्वारे दर्शन
कृष्णा महोत्सवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्या ताटात भाकरी येण्यासाठी राबणारा शेतकर्यांाचे गौरव करणारे गीत… स्वराज्य निर्मितीत हेरगिरीद्वारे मोलाची भूमिका बजावणार्यात लोकांचे पारंपारिक ठाकर गीत अन् भूपाळी ते भव्य दिव्य राज्याभिषेक सोहळा दाखविणार्याक ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या संगीतमय नृत्य कार्यक्रमाने कराडकर अक्षरशः भारावले होते. या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्डेडियमवर आयोजित कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्राची लोकधारा दाखविणारा अंतरंग प्रस्तुत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या संस्कृतीची गाथा लक्षवेधी व डोळ्याचे पारणे फेडणार्याक नृत्याद्वारे सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले व सौ. गौरवी भोसले यांच्यासह मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली.
ग्रामीण भागात भूपाळीद्वारे आपल्या जीवन कार्याची सुरूवात होत होती आणि याच लोकधारेचे प्रात्यक्षिक संगीतमय नृत्याद्वारे ‘घन:श्याम सुंदरा श्रीहरा’ या गीताद्वारे झाले. त्याचवेळी सर्वाधिक ऑक्सिजन पुरविणार्या्पैकी एक असणार्यात तुळस पूजनाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी ‘वासुदेव आला रे वासुदेव…’, शेतकर्यांकना अन्न पिकविण्यासाठी मदत करणार्याी घटकांपैकी एक असणार्याे बैलांचे कौतुक करणारे ‘सर्जा राजाची बैलजोडी’ या गीताच्या माध्यमातून बळीराजाच्या अपार कष्टाची एक झलकच पहावयास मिळाली. याशिवाय सह्याद्रीच्या कडेकपार्यागतून घाट रस्ते निर्मितीसाठी मोलाची भूमिका बजाविणार्या धनगर समाजाचा गौरव करत ‘आम्ही धनगर रानामाळात’ हे गीत सादर करण्यात आले.
त्याचबरोबर अनाथांचा नाथ म्हणून ओळख असणार्याय संत एकनाथ यांनी डोळ्यात अंजन घालून भारूडाच्या माध्यमातून जनउद्धाराचा प्रयत्न केला. त्यांचा हाच प्रयत्न ‘विंचू चावला… अगं अगं अगं काय मी करू’ या गीतासह नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले भारूड उपस्थित सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारे होते. याशिवाय ‘देवा तुझ्या दारी आलो’, ‘दिंडी चालली’, ‘आली ठुमकत नार’, ‘आमी ठाकर’ या महाराष्ट्राला वेड लावणार्याा गीतांसह अन्य मनमोहक गीतांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साकारात लोकसंस्कृतीचे सुमारे दोन ते अडीच तास दर्शन घडविणार्याच या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात महेश हिरेमठ, शुभांगी जोशी, रसिता झावरे, सीताराम जाधव यांनी आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. भार्गव कांबळे, कपिल कदम, महेश कदम, अनिल बागडी, आकाश साळोखे, मंदार जाधव या कलाकारांनी ढोलकी, तबला, इलेक्ट्रीक गिटार, सुमधूर बासरी वाजवत प्रेक्षकांची मने जिंकली. तर लोककलेची अभ्यासपूर्ण मांडणी करत सूत्रसंचलनाद्वारे धनंजय जोशी यांनी उपस्थितांची मने जिंकली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »