मा.मनोहर भास्करराव शिंदे(भाऊ)यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
मा.मनोहर भास्करराव शिंदे(भाऊ)यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
कराड : ग्राम दौलत-
मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा सभापती, आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती श्री. मनोहर भास्करराव शिंदे, अध्यक्ष कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी यांचा दिनांक ०९ जानेवारी, २०२४ रोजी वाढदिवस संपन्न होत असून, या वाढदिवसानिमित्त दिनांक ०७ व ०८ आणि ०९ जानेवारी, २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री. मनोहर शिंदे मित्रपरिवार यांचेवतीने आयोजित करणेत आलेले आहेत.
दिनांक ०७ जानेवारी, २०२४ रोजी लक्ष्मीनगर मलकापूर या ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय व यशवंत ब्लड बैंक यांच्यावतीने सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळेत करणेत आले असून, यावेळी १०० रक्तदाते रक्तदान शिबीरात रक्तदान करण्याचे नियोजन आहे. तसेच सोमवार दि.०८ जानेवारी, २०२४ रोजी लक्ष्मीनगर, मलकापुर या ठिकाणी गांधी फौंडेशन, कराड व सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने आयोजित आरोग्य शिबीराचे आयोजन केले असून, सदरचे आरोग्य शिबीरामध्ये गरोदर माता तपासणो, नेत्र तपासणी, रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी तसेच ई.सी.जो. इत्यादी तपासण्या सकाळी ९.३० ते दुपारी २.०० या वेळात करणेत येणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन श्री. मनोहर शिंदे मित्रपरिवार यांनी केले आहे.
दिनांक ०९ जानेवारी, २०२४ रोजो १) सकाळी ९.३० वाजता मदरसा जियाउल कुरआन, प्रितीसंगम मंगल कार्यालयाजवळ, मलकापूर येथे विद्याथ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वाटप मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम धनंजय येडगे, नगरसेविका सौ. नंदा भोसले व सौ. अलका जगदाळे, यांचे हस्ते करणेत येणार आहे. तसेच २) सकाळी १०.३० वाजता बालसुधारगृह केंद्र, शास्त्रीनगर मलकापूर या ठिकाणी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती श्री. राजेंद्र यादव (आबा), श्री. प्रशांत चांदे, सभापती नियोजन विकास व शिक्षण समिती, नगरसेविका सौ. गितांजली पाटील यांचे हस्ते शैक्षणिक साहित्य व फळ वाटप करणेत येणार असून, ३) सकाळी ११.०० वा. द. शि. एरम मुक-बधीर विद्यालय सैदापूर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वाटप मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. मोहनराव सखाराम शिंगाडे व श्री. नारायण रैनाक, नगरसेवक यांचे हस्ते संपन्न होणार आहे.
मंगळवार, दिनांक ०९ जानेवारी, २०२४ रोजी वाढदिवसानिमित्त गो.का.क. सहकारी पाणीपुरवठा कार्यालय या ठिकाणी दुपारी १.०० नंतर शुभेच्छा स्विकारणार आहेत. मा. श्री. मनोहर शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना मलकापूर मधील सर्व मित्र परिवार व हितचिंतक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. निलम येडगे व बांधकाम सभापती श्री. राजेंद्र यादव यांनी केले आहे.