जीवनशैली

कराड-ढेबेवाडी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना राबवा

कराड-ढेबेवाडी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना राबवा
दादासाहेब शिंगण; मनसेच्या वतीने कोळे येथे 20 जानेवारीला रस्ता रोकोचा इशारा
कराड : ग्राम दौलत-
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मधुअमतुन कराड-ढेबेवाडी महामार्गाचे काम करण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या नसल्याने वारंवार अपघात होत असून नागरीकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आवश्यक तिथे पांढरे पट्टे, रंबलरचे गतीरोधक, गाव, शाळा, वळणरस्ता दर्शक पाटया लावाव्यात. अन्यथा, 20 जानेवारीला कोळे बसस्थानक येथे रस्ता रोको करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, कराडचे उपविभागीय अधिकारी प्रमोद चौधरी यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, कराड दक्षिण विभाग प्रमुख शंभूराज भिसे-पाटील, दिपक मुळगावकर, अंकुश कापसे, अनिकेत पवार, दिपक रेठरेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. शिंगण म्ह्णाले, कराड-ढेबेवाडी महामार्गावरील चकाचक रस्ता झाल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. रस्त्याचे काम पुर्ण झाले असले, तरी अपघात टाळण्यासाठी सदर रस्त्यावर सुरक्षेच्या उपाययोजना अद्याप राबवल्या नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. वास्तविक रस्त्याच्या दुतर्फा असलेली गावे, शाळा, लोकवस्ती, वळण रस्ते आदींबाबतच्या पाटया लावण्याची आवश्यकता आहे. तसेच रस्त्यामधील दुभाजकात वाढल्याने गवत खाण्यासाठी जनावरे महामार्गावर येत असल्यानेही अपघात होत आहेत. रस्त्यालगत असलेली गाव, लोकवस्ती व शाळेनजीक रंबलरचे गतीरोधक करण्याची आवश्यकता आहे. रोड क्रॉसिंगवर झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे आखण्याची आवश्यकता आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गांभिर्याने दखल घेऊन सुरक्षेच्या सर्व उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा, 20 जानेवारी रोजी कोळे येथील बसस्थानक परीसरात रस्ता रोका करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »