कराड मलकापूर उड्डाणं पुलाच्या कामाचा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आढावा
कराड मलकापूर उड्डाणं पुलाच्या कामाचा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आढावा
कराड : प्रतिनिधी –
कराड व मलकापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो येथील बहुप्रतीक्षित उड्डाणं पुलाचे काम सद्या युद्ध पातळीवर सुरु आहे. या पुलाचे काम सुरु झालेपासून दर महिन्याला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आढावा घेत असतात. आताही आ. चव्हाण यांनी पुलाच्या कामाचा आढावा हायवेच्या अधिकाऱ्यांकडून घेतला. यावेळी सहा पदरी सेगमेंटल पुलाच्या दुसऱ्या टप्प्याची उभारणी करण्यात आली. ढेबेवाडी फाटा येथील पिलरवर सेगमेटलची उभारणी करण्यात आली. यावेळी मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपगराध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरचे मुख्याधिकारी, युवानेते इंद्रजित चव्हाण, अशोकराव पाटील, ट्राफिक पोलीस निरीक्षक श्री मचले, या हायवेचे काम पाहणारे डी पी जैन कंपनीचे व्ही पी प्रदिपकुमार जैन, प्रोजेक्ट मॅनेजर सतेंद्रकुमार वर्मा, सौरभ घोष आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कराड व मलकापूर शहरातून जाणारा जुना उड्डाणं पूल पाडून नवीन उड्डाणं पूल बांधण्याचे काम सुरु आहे. पूल बांधताना ट्राफिक च्या वारंवार होत असलेल्या समस्या कशा सोडविता येतील याबाबत आढावा घेतला. असाच आढावा मी पुलाचे काम सुरु झालेपासून दर महिन्याला घेत आहे. देशात कमी ठिकाणी अशा पुलाची उभारणी होत आहे. एक पिलरवर सहा लेन व पुलाखाली आठ लेन असे एकूण 14 लेनचे काम सुरु आहे. अशावेळी दोन्ही शहरातील व प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असतो, हा त्रास कशा पद्धतीने कमी करता येईल याचे नियोजन केले तसेच याबाबत कोल्हापूर विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन ट्राफिक चा तसेच दोन्ही शहराच्या दृष्टीने महत्वाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.