जीवनशैली

रेठरे बुद्रुकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहा : डॉ. अतुल भोसले

रेठरे बुद्रुकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहा : डॉ. अतुल भोसले
ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार
कराड : प्रतिनिधी –
रेठरे बुद्रुक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्थांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कृष्णा विकास आघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार हणमंत सूर्यवंशी यांच्यासह सदस्यपदाचे सर्व उमेदवार निवडून आले. या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नूतन सदस्यांशी संवाद साधताना डॉ. भोसले म्हणाले, की ग्रामस्थांनी सर्व उमेदवारांवर दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांनीच रेठरे बुद्रुकच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे. रेठरे बुद्रुकमध्ये राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली असून, काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत. गावात १०० टक्के कचरा निर्मूलनासाठी लवकरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत. याचबरोबर लोकजागृतीही महत्वाची आहे. रेठरे बुद्रुकच्या अध्यात्मिक पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी लवकरच राज्याच्या पर्यटनमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असून, गावातील प्रलंबित कामांसाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करावेत.
यावेळी नूतन सरपंच हणमंत सूर्यवंशी, शरद धर्मे, रुक्साना मुल्ला, संग्राम पवार, संगीता सावंत, सचिन जाधव, शर्मिला मोहिते, भाग्यश्री पवार, काजल आवळे, सविता पाटील, नवनाथ डोईफोडे, सुहास घोडके, स्वाती फसाले, तुकारात पवार, दत्तात्रय मोहिते, वैशाली कदम, रेश्मा बनसोडे, चंद्रकांत साळुंखे यांच्यासह कृष्णा विकास आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »