व्यवसाय

कोयना बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सभासदांना भेटवस्तु वाटप शुभारंभ

कोयना बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सभासदांना भेटवस्तु वाटप शुभारंभ
कराड : प्रतिनिधी –
बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बँकेच्या सभासदांना भेटवस्तु वाटप कार्यक्रम बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहामध्ये बँकेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी बँकेचे चेअरमन रोहित पाटील, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा चेअरमन जगन्नाथ मोरे, रयत कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरूड, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, जि. प. सदस्य प्रदीप पाटील, प्रा.धनाजी काटकर, हणमंतराव चव्हाण साजूरकर, संपतराव इंगवले, बाबुराव धोकटे, मोहनराव माने, बाजार समितीचे संचालक जगन्नाथ लावंड, नितीन ढापरे, प्रकाश पाटील, बॅकेचे उपाध्यक्ष विजय मुठेकर, सर्व संचालक मंडळ, कोयना बँकेचे अधिकारी सेवक व रयत संघटनेतील कार्यकत्यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री, लोकनेते स्व. विलासरावजी पाटील (काका) यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन करणेत आले.
यावेळी बोलताना अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, कोयना बँकेने अधुनिक तंत्राचा अवलंब करून बँकेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. उद्दिष्ठ पुर्तता बरोबरच आदर्शवत व पारदर्शक बँकिंग करत बँकेची सांपत्तीक स्थिती भक्कम झाली आहे. बँकेने मोबाईल बँकिंग सुविधा कार्यान्वित केली असून खातेदारांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन यावेळी केले.
आर्थिक क्षेत्रात जी स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये सुद्धा संघटनेच्या आर्थिक संस्था सुस्थितीत चालल्या आहेत. बँकेचे संचालक मंडळ, सेवक वर्ग बँकेचा गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु संघटनेतील कार्यकर्ता म्हणून तुमची आमची एक जबाबदारी बनते की या आर्थिक संस्था अधीक सक्षम कशा करता येतील याकरीता तुमचे आमचे योगदान महत्वाचे आहे. स्व. काकांनी ५३ वर्षे सामाजिक जीवनामध्ये तालुक्यात, जिल्ह्यात संघटनेच्या माध्यमातून
काम केले. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक देशात अग्रगण्य बँक म्हणून नावारूपास आणली परंतु रयत साखर कारखान्यात अयशश्वी झालो ही काकांच्या मनामध्ये खंत होती. ती खंत संचालक मंडळाला बोलून दाखविली संचालक मंडळानी काकांना पुन्हा एकदा प्रयत्न करणेबाबत चर्चा होवून काकांनी स्वताचे योगदान देत काही योजना तयार केल्या. २५०० टन गाळप क्षमतेचा कारखाना १०० कोटीच्या कर्जामध्ये होता. तो २५०० टन क्षमतेचा कारखाना कर्जमुक्त होवून आज तो ५००० टन गाळप क्षमतेचा, १५ मेगावॅट कोजनरेशसह आज तो गाळपास तयार होत आहे. हे संघटनेन केलेल काम आहे त्यामागे काकांचे वैचारिक अधिष्ठान क्लिअर होती. काकांच्या वौचारिक अधिष्ठानावर संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विश्वास होता. दुर्दैवाने काका आज आपल्यात नाहीत, आपण सर्वजण स्व. काकांचे विचार जोपासत आहोत. माझाही तोच प्रयत्न आहे. जरूर मी काकांचा मुलगा आहे त्याचा मला अभिमान आहे. पण मी तुमच्यातील संघटनेचा कार्यकर्ता म्हणून तुमच्यासारखा वैचारीक वारसा घेवून जाणारा कार्यकर्ता तुमच्यासोबत काम करतो आहे. अडचणी प्रचंड येणार आहेत, प्रत्येक संकटाला सामोरे जाव लागणार आहे. पण वैचारीक बैठक आपली सक्षम असण काळाची गरज आहे असे अवाहन यावेळी केले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी पास्ताविक भाषणात बँकेच्या भक्कम आर्थिक स्थिचा उहापोह करून सभासदांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाखेत जावून आधार, पॅनकार्ड व फोटो दाखल करून भेटवस्तु घ्यावी असे अवाहन केले. प्रा. धनाजी काटकर, लक्ष्मणराव देसाई यानी मनोगत व्यक्त केले. बँकेचे संचालक राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »