आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं..; कराडला मराठा समाजाचा विराट मोर्चा
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं..; कराडला मराठा समाजाचा विराट मोर्चा
कराड तालुका मराठा समाजाच्या वतीने आज मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चामध्ये हजारो आबाला विरुद्ध सहभागी झाले होते.
कराड : प्रतिनिधी –
एक मराठा लाख मराठा… कोण – म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय आरक्षण आमच्या हक्काचं, नाही … कुणाच्या बापाचं या ना अशा घोषणा देत कराड तालुका मराठा समाजाच्या वतीने आज मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला आहे मोर्चामध्ये हजारो आबाला विरुद्ध सहभागी झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला ५० टक्यांच्या आत आरक्षण मिळावे यासाठी कराड येथे आज सोमवारी कराड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यासाठी शहरासह गावोगावी जनजागृती करुन मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
त्यामुळे शहरासह गावा-गावातील आबालवृध्द मराठे हजारोच्या संख्येने येथे दाखल झाले होते. आज सकाळी कराडच्या येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चाला प्रारंभ झाला.तत्पूर्वी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.