सर विश्वेश्वरय्या पुरस्कार आबासाहेब शिंदे यांना जाहीर
सर विश्वेश्वरय्या पुरस्कार आबासाहेब शिंदे यांना जाहीर
कराड : प्रतिनिधी –
येथील आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा सर विश्वेश्वरय्या पुरस्कार निवृत्त कार्यकारी अभियंता आबासाहेब शिंदे यांना देण्यात येणार आहे. त्याचे वितरण शुक्रवारी (ता. १३) होणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष महेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषेदत दिली. या वेळी उपाध्यक्ष दिग्विजय जानुगडे, सचिव अमित उंब्रजकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात समृद्धी महामार्गाच्या उभारणीबाबत मुख्य अभियंता एस. के. सुरवसे व अधीक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते माहि देणार आहेत. येथील वेणूताई चव्हाण सभागृहात कार्यक्रम होणार आहे. श्री. कुलकर्णी म्हणाले, “निवृत्त कार्यकारी अभियंता आबासाहेब शिंदे यांना सर विश्वेश्वरय्या पुरस्कार कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे उपस्थित राहणार आहेत.