शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,कराड च्या माजी विद्यार्थी डॉ.केशव सांगळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु ह्यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार प्रदान
कराड:प्रतिनिधी-
डॉ.केशव सांगळे यांचा महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार २०२३ शिक्षक दिनानिम्मित नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला आहे.
डॉ.केशव सांगळे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड मधून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी १९९७ तसेच पदव्युत्तर पदवी १९९९ मध्ये संपादित केली आहे. डॉ. सांगळे हे मुळगाव अहमनगर जिल्यातील श्रीगोंदा तालुक्यातील वेळू गावचे आहेत. सध्या डॉ.केशव सांगळे हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था(V.J.T.I) मुंबई येथे स्थापत्य अभियांत्रिकी चे प्राध्यापक तथा अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.
डॉ.केशव सांगळे यांनी आपल्या पुरस्काराबद्दल बोलताना म्हंटले आहे कि , माझ्या या यशामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड चे मोलाचे योगदान लाभलेले आहे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री.मोरेश्वर भालसिंग, प्राचार्य डॉ.संजीव वाघ, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.लक्ष्मण एल. कुमारवाड ह्यांनी भ्रमणध्वनीवरून डॉ.केशव सांगळे यांचे अभिनंदन केले.