उद्योजक कल्याणींची केळी कृषी प्रदर्शनात ‘टॉप’ला येणके गावची ‘केळी’ दुसऱ्या क्रमांकाची मानकरी

उद्योजक कल्याणींची केळी कृषी प्रदर्शनात ‘टॉप’ला
येणके गावची ‘केळी’ दुसऱ्या क्रमांकाची मानकरी
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
शेती उत्पन्न बाजार समिती कराड , राज्य शासन व जिल्हा परिषद कृषी विभाग आणि आत्मा प्रकल्प यांच्यावतीने येथे सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनात शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित केळी पीक स्पर्धेत, उद्योजक गौरीशंकर निळकंठ कल्याणी यांच्या विंग ता. कराड येथील केळी बागेतील केळी घडाने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत कराड तालुक्यातीलच येणके येथील केळी उत्पादक बबन सिताराम गरुड यांच्या बागेतील केळीच्या घडाला द्वितीय क्रमांक मिळाला. तर आणे तालुका कराड येथील संकेत शिवाजी देसाई व येणके येथीलच प्रशांत हिंदुराव गरुड यांच्या बागेतील केळी घडांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. तर आळसूंद ता. खानापूर येथील अशोक आनंदराव जाधव व पोतले ता. कराड येथील शंकर रामचंद्र पाटील यांच्या बागेतील केळी घडांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ अशी बक्षीसे व प्रमाणपत्र, शिल्ड देण्यात येणार आहे.






