कराड नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी २२, तर नगरसेवकपदासाठी तब्बल ३३० अर्ज

कराड नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी २२, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३३० अर्ज
कराड: संतोष शिंदे-
कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांचा मोठा ओघ पाहायला मिळत असून सोमवारी अखेर नगराध्यक्ष पदासाठी २२, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ३३० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
आज सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी विनायक पावसकर (भाजप), इंद्रजीत गुजर (भाजप), राजेंद्र माने (भाजप), किरण थोरवडे, इमरान मुल्ला (बसप), गणेश कापसे, रणजीत पाटील व श्रीकांत घोडके (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले. नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय आलेल्या उमेदवारी पुढीलप्रमाणे आहेत.
प्रभागनिहाय अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे;
प्रभाग १ अ मध्ये विमल माने (भाजप), प्रभाग १ ब मध्ये सुदर्शन पाटसकर (अपक्ष), जयवंत पाटील (लोकशाही आघाडी), वीरेंद्र सिंहासने (लोकशाही आघाडी/राष्ट्रवादी काँग्रेस); प्रभाग २ ब मध्ये नीलम कदम (लोकशाही आघाडी); प्रभाग ३ अ मध्ये कश्मीरा इंगवले (यशवंत विकास आघाडी/राष्ट्रवादी अजित पवार गट), वंदना देशमुख (अपक्ष), जमीर नदाफ (राष्ट्रवादी काँग्रेस), तबसुम आंबेकरी (लोकशाही आघाडी); प्रभाग ३ ब मध्ये रियाज मुजावर व फिरोज मुजावर (जनशक्ती आघाडी), साहेबराव शेवाळे (राष्ट्रवादी अजित पवार गट/यशवंत विकास आघाडी), सागर लादे (अपक्ष), संकेत पवार (अपक्ष), जावेद शेख (राष्ट्रवादी काँग्रेस).
प्रभाग ४ ब मध्ये आनंद लादे (राष्ट्रवादी काँग्रेस/अपक्ष), महेश कांबळे (लोकशाही आघाडी), सिद्धार्थ थोरवडे (यशवंत विकास आघाडी); प्रभाग ५ अ मध्ये रेवती बर्गे (भाजप), स्नेहल कदम (यशवंत विकास आघाडी), मिनाज सुतार (राष्ट्रवादी काँग्रेस/अपक्ष), अरुणा पाटील (लोकशाही आघाडी), रजनी शिंदे (भाजप); प्रभाग ५ ब मध्ये राजेंद्र कांबळे (एनसीपी–शरद पवार गट/अपक्ष), अशोक सूर्यवंशी (यशवंत विकास आघाडी/शिवसेना), आशुतोष कात्रे (अपक्ष), सुरेश लादे (लोकसेवा शहर विकास आघाडी), सागर लादे (भाजप), योगेश लादे (राष्ट्रवादी काँग्रेस).
प्रभाग ६ अ मध्ये साजिदा मुल्ला (यशवंत विकास आघाडी/शिवसेना), वहिदा इनामदार (अपक्ष), शारदा माने (भाजप), सुनंदा माने (भाजप); प्रभाग ६ ब मध्ये राहील मुतवल्ली (अपक्ष), आलेज मुतवल्ली (राष्ट्रवादी काँग्रेस), अल्ताफ शिकलगार (यशवंत विकास आघाडी); प्रभाग ७ अ मध्ये वंदना गायकवाड (अपक्ष), तेजश्री पाटसकर (अपक्ष), गायत्री कुंभार (भाजप), प्रिया आलेकरी (यशवंत विकास आघाडी); प्रभाग ७ ब मध्ये विनायक मोहिते (अपक्ष), मन्सूर खैरतखान (अपक्ष), अभिषेक बेडेकर (लोकशाही आघाडी), दीपक पाटील (भाजप).
प्रभाग ८ अ मध्ये शालिनी शाह (भाजप/अपक्ष), सुनीता साळुंखे (यशवंत विकास आघाडी/शिवसेना), देवयानी डुबल (शिवसेना/यशवंत विकास आघाडी); प्रभाग ८ ब मध्ये विजय वाटेगावकर (भाजप), संजय चन्ने (शिवसेना/यशवंत विकास आघाडी); प्रभाग ९ अ मध्ये साजिदा मुल्ला (यशवंत विकास आघाडी/शिवसेना), शमीमा बागवान (जनशक्ती आघाडी), विजया पवार (शिवसेना/यशवंत विकास आघाडी/अपक्ष), शैनाज मुजावर (जनशक्ती आघाडी), नाजीया पटवेकर (राष्ट्रवादी काँग्रेस/अपक्ष); प्रभाग ९ ब मध्ये आशुतोष जाधव, जयंत जाधव (जनशक्ती आघाडी), हणमंत पवार (शिवसेना/यशवंत विकास आघाडी), समीर पटवेकर (राष्ट्रवादी काँग्रेस/अपक्ष), विक्रम जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस).
प्रभाग १० अ मध्ये मनीषा घाडगे (राष्ट्रवादी काँग्रेस/अपक्ष); प्रभाग १० ब मध्ये नागेश कुरले (अपक्ष), सुमित जाधव (भाजप), फैयाज कागदी (अपक्ष), प्रताप इंगवले (शिवसेना/अपक्ष), यशराज सुर्वे (लोकशाही आघाडी), समाधान चव्हाण (अपक्ष), ऋतुराज मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस/यशवंत विकास आघाडी); प्रभाग ११ अ मध्ये शुभांगी भोसले (लोकशाही आघाडी), सुनीता तपासे (भाजप); प्रभाग ११ ब मध्ये अजित भोसले, भानुदास धोत्रे, गणेश पवार (अपक्ष), योगेश वेल्हाळ, विनायक वेल्हाळ (शिंदे गट).
प्रभाग १२ अ मध्ये पूजा केंगार (भाजप/शिवसेना), स्मिता धोत्रे (भाजप), तेजस्विनी कुंभार (यशवंत विकास आघाडी), नसरीन शेख (अपक्ष), माधुरी पवार (यशवंत विकास आघाडी/अपक्ष), छाया घोडके (भाजप), सरिता हरदास (भाजप); प्रभाग १२ ब मध्ये इंद्रजीत गुजर (भाजप), फैयाज कागदी (अपक्ष), राकेश पवार (यशवंत विकास आघाडी), अनिस मुलाणी (अपक्ष), किसन उर्फ जयवंत चौगुले (अपक्ष), श्रीकांत घोडके (अपक्ष).
प्रभाग १३ अ मध्ये शहनाज मुलाणी (यशवंत विकास आघाडी/राष्ट्रवादी काँग्रेस/अपक्ष), तनुजा मुलाणी (राष्ट्रवादी काँग्रेस/यशवंत विकास आघाडी/अपक्ष); प्रभाग १३ ब मध्ये किरण पाटील (शिवसेना/यशवंत विकास आघाडी), पोपट शिंदे (शिवसेना/यशवंत विकास आघाडी), अमरजीत राजपुरे (राष्ट्रवादी काँग्रेस/अपक्ष); प्रभाग १४ ब मध्ये किरण सूर्यवंशी (शिवसेना/यशवंत विकास आघाडी), इंद्रजीत भोपते (शिवसेना/यशवंत विकास आघाडी/राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन पवार (भाजप).
प्रभाग १५ अ मध्ये पुनम घेवदे, प्राजक्ता घेवदे (भाजप), योगिता जगताप (अपक्ष), गीता पाटसुपे (अपक्ष/राष्ट्रवादी काँग्रेस), शिला रसाळ (अपक्ष), दया गायकवाड (अपक्ष), सुजाता गायकवाड (अपक्ष); प्रभाग १५ ब मध्ये अमीर हुसेन मुल्ला (अपक्ष/राष्ट्रवादी काँग्रेस), मोहसीन आंबेकरी (अपक्ष), अख्तर आंबेकरी (अपक्ष/लोकशाही आघाडी), श्रीधर फुटाणे (अपक्ष), अखिल आंबेकरी (अपक्ष/यशवंत विकास आघाडी), नईम पठाण (अपक्ष); प्रभाग १५ क मध्ये हसीना मुल्ला (अपक्ष/राष्ट्रवादी काँग्रेस), तेजस्वी खराडे (अपक्ष), सुप्रिया खराडे (अपक्ष), मंदा खराडे (अपक्ष), संगीता शिंदे (भाजप), सुवर्णा खराडे (राष्ट्रवादी काँग्रेस) या सर्वांसह सोमवारी एकूण २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
दरम्यान, नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी आज मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र, शनिवार पेठ, कराड येथे होणार असून सर्वप्रथम नगराध्यक्ष पदाची आणि त्यानंतर प्रभागनिहाय छाननी करण्यात येईल, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले.






