जीवनशैली

कराड अर्बन बँकेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा आनंदराव पाटील (नाना )यांच्याकडून सत्कार

कराड अर्बन बँकेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा आनंदराव पाटील यांच्याकडून सत्कार
कराड: ग्रामदौलत न्यूज नेटवर्क-
कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, तर उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची निवड झाल्याबद्दल विधान परिषदेचे सदस्य व माजी आमदार आनंदराव पाटील यांनी बँकेस सदिच्छा भेट देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, तसेच संचालक चंद्रकुमार डांगे, डॉ. राहुल फासे, मानसिंगराव पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना आनंदराव पाटील म्हणाले, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी आणि माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी बँकेच्या कामकाजातील पारदर्शकतेचा आदर्श निर्माण केला आहे. कराड अर्बन बँकेने सामाजिक उपक्रमांसोबतच ग्राहकांसाठी अल्प व्याजदराच्या कर्ज योजना व महिलांसाठी विशेष ‘आई पर्यटन उद्योग कर्ज योजना’ राबवून ग्राहकहिताला प्राधान्य दिले आहे.
ते पुढे म्हणाले, ग्राहक हा केंद्रबिंदू मानून सेवा देणारी अर्बन बँक सहकार क्षेत्रात नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. गेल्या दोन दशकांतील बँकेची वाटचाल आर्थिकदृष्ट्या सक्षम पायावर उभी राहिली असून, सध्या बँक ६००० कोटी रुपयांच्या व्यवसायपूर्तीकडे वाटचाल करत आहे. संचालक मंडळाने पुढील काळातही बँकेची प्रगती अधिक वेगाने साधावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष समीर जोशी आणि उपाध्यक्ष शशांक पालकर यांनीही बँकेच्या सर्व ग्राहक, भागधारक व सहकाऱ्यांचे आभार मानले आणि बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »