संतोष खालकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

संतोष खालकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कोल्हापूर येथील समर्थ सोशल फाउंडेशन व न्युटीफिल हेल्थ प्रा लि.या सामाजिक संस्थेमार्फत दिला जाणारा 2025 चा व्यसनमुक्ती दूत व मधुमेह मुक्त मधूदुत म्हणून दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार तरूण भारत चे पत्रकार संतोष खालकर यांना जाहीर झाला आहे.
समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर ही संस्था 2015 पासून देशासह अन्य तेरा देशात व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती साठी कार्यरत आहे. त्यातून संस्थेच्या माध्यमातून हजारो लोक मधुमेह मुक्त व व्यसनमुक्त झाली आहेत.या संस्थेतर्फे चांगले कार्य व शेकडो लोकांना मधुमेह व व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना यापूर्वी असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.अशाच प्रकारे या संस्थेचे कार्य घरोघरी पोहचविण्यासाठी व आपल्या संपर्कातील लोकांना त्याच्या व्याधीतून बाहेर काढण्यासाठी उपचार, आहार,पत्य तसेच व्यायाम संदर्भात मार्गदर्शन करून शेकडो लोकांना मधुमेह मुक्त व व्यसनमुक्त करण्याचें काम संतोष खालकर यांनी केले आहे.या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळत आहे. याची दखल घेऊन हजारो पी आर ओ मधून उत्कृष्ट पी आर ओ म्हणून निवड होवून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे पी आर ओ संतोष खालकर रा भोळेवाडी ता कराड यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याची वितरण सप्टेंबर 2025 मध्ये कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.