देवेन्द्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्री तर डॉ. अतुलबाबा भोसले यांची मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी श्री रत्नेश्र्वर मंदिरात भाजपा कराड शहरच्या वतीने अभिषेक
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
कराडमध्ये महाराष्ट्राचे लाडके लोकनेते देवेन्द्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी आणि नव निर्वाचित जायंट किलर आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांची मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी कृष्णामाई घाट परिसर येथील श्री रत्नेश्र्वर मंदिरात भाजपा कराड शहरच्या वतीने शहराध्यक्ष एकनाथ बागडी व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ,महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रत्नेश्वराला अभिषेक करून साकडे घातले.यावेळी शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद शिंदे,अनुसूचित जिल्हाउपाध्यक्ष सागर लादे,शहर सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी,विश्वनाथ फुटाणे,रुपेश मुळे,मुकुंद चरेगावकर,रमेश मोहिते, संजय शहा, प्रितेश मेहता, केतन शहा, विशाल कुलकर्णी, सौरभ शहा,अनिल पवार,सोपान तावरे,पल्लवी तावरे,राहुल आवटी,सौरभ शहा,राजेंद्र खोत,मंजिरी कुलकर्णी,धनश्री रोकडे,कविता माने,स्वाती मोहिते,दैवशीला मोहिते,सुमन बागडी,राजश्री कारंडे,रोहिणी साळवी,चेतन थोरवडे,नितीन भोसले, तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी हजर होते.