डॉ. अतुल बाबा भोसले यांचा विजय निश्चित : छत्रपती उदयनराजे भोसले डॉ अतुल बाबांनी भरला उमेदवारी अर्ज
अतुलबाबांचे कामच बोलते, विजय निश्चित
उदयनराजे भोसले; अतुल भोसले यांनी साधेपणाने दाखल केला उमेदवारी अर्ज
कराड: ग्रामीण न्युज नेटवर्क –
कोणतेही पद नसताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसले यांनी कोट्यावधींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. जनताच लोकशाहीतील खरे राजे आहेत. त्यामुळे जनतेनेही एक व्यक्ती म्हणून अतुलबाबांकडे बघून त्यांच्या कामाची पोहोचपावती मतदानातून द्यावी. लोकसभेला मला कराड दक्षिणमधून अतुलबाबांनी निर्णय मताधिक्य दिले. आता मी त्यांच्यासोबत उभा आहे. खरंतर, त्यांचा प्रचार करण्याची गरजच नाही. त्यांचे कामच सर्व काही बोलते, असे सांगून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले व कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दि. 24 रोजी वारकरी, माजी सैनिक, शेतकरी आणि माता-भगिनींच्या उपस्थितीत अगदी साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खा. उदयनराजे बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, आप्पा माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अडीच वर्षांत 745 कोटींचा निधी :
गेल्या पाच वर्षांत महायुती सरकारकडे आपण मागितलेल्या विकासकामांसाठी आतापर्यंत एकूण 745 कोटी 27 लाख रुपयांचा भरघोस निधी दिला असल्याचे संगत डॉ. अतुल भोसले म्हणाले, त्यातील बहुतांश कमी आज पूर्णत्वास आली असून काही प्रगतीपथावर आहेत. कराडमधील शिवाजी स्टेडियमसाठी 96 कोटींच्या निधीची तरतूद आहे. परंतु, विरोधकांनी केवळ दहा लाखांची तरतूद असल्याचे जाहीर व्यासपीठावर सांगितले. स्वतःला मोठा नेता समजणाऱ्यांनी शासन निर्णय न पाहता असे वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावत आतापर्यंत माहिती सरकारच्या माध्यमातून झालेल्या घोषणा व व निधीच्या तरतुदीबाबत सर्वांसमोर पुराव्यांनिशी आकडेवारी सांगितली. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्याचा समाचारही त्यांनी यावेळी घेतला.