डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांतून मलकापूरला २०.८० कोटींचा निधी मंजूर पायाभूत सुविधांसह विविध ४१ विकासकामे लागणार मार्गी; नागरिकांत समाधान
डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांतून मलकापूरला २०.८० कोटींचा निधी मंजूर
पायाभूत सुविधांसह विविध ४१ विकासकामे लागणार मार्गी; नागरिकांत समाधान
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
कराड तालुक्यातील एक महत्वाचे शहर म्हणून मलकापूरकडे बघितले जाते. या शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रयत्नशील होते. त्यांनी शासनस्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने मलकापूरच्या विकासासाठी
तब्बल २० कोटी ८० लक्ष रुपयांचा विकासनिधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून मलकापूर शहरातील पायाभूत सुविधांसह अन्य विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे या निधीबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
कराड शहरालगत झपाट्याने विस्तारणारे शहर म्हणून मलकापूरला ओळखले जाते. या शहरात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत असतानाही, येथील बराचसा भाग अनेक सुविधांपासून वंचित राहिला होता.
मलकापूरसाठी डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी मलकापूरात जल्लोष साजरा केला. ढेबेवाडी फाटा येथे कार्यकर्त्यांनी साखर – पेढे वाटप करुन, डॉ. भोसले यांचे विशेष आभार मानले. डॉ. अतुल भोसले यांच्यामुळे मलकापूरला मिळालेल्या विकासनिधीमुळे मलकापूरात विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त कार्यकर्ते व मलकापूरवासीयांनी डॉ. भोसले यांचे आभार मानले आहेत.