जीवनशैली

रमजान ईदनिमित्त हाजी अल्ताफभाई शिकलगार यांच्या तर्फे दावत ए शीरखुर्मा कार्यक्रम उत्साहात संपन्न

रमजान ईदनिमित्त हाजी अल्ताफभाई शिकलगार यांच्या तर्फे दावत ए शीरखुर्मा कार्यक्रम उत्साहात संपन्न
कराड: ग्रामदौलत न्यूज नेटवर्क –
रमजान ईदच्या शुभनिमित्त ऐतिहासिक जामा मशीद परिसरात हाजी अल्ताफभाई शिकलगार यांच्या तर्फे आयोजित शीरखुर्मा वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने पार पडला. अल्ताफभाई शिकलगार हे कराड नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती आहेत. या कार्यक्रमाला कराड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस निरीक्षक श्री.दराडेसाहेब तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने हजरी लावली असून, सर्वजण एकत्र येऊन सणाचा आनंद साजरा केला. या कार्यक्रमात अल्ताफभाई शिकलगार यांनी सर्वांना रमजानच्या पवित्र महिन्याचे महत्त्व सांगितले आणि सर्व समाज बांधवांना एकतेचा संदेश दिला. उपस्थितांनी त्यांचे कौतुक करत हातभार लावला.
या कार्यक्रमाने कराड शहरातील सामाजिक सौहार्द वाढला असून, सर्वांनी अल्ताफभाई शिकलगार यांचे आभार मानले. शहरवासीयांनी अशा उपक्रमांची पुनरावृत्ती अपेक्षित असल्याचे सांगितले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री गफार सुतार, युनूस तांबोळी, शाहरुख शिकलगार,जावेद बागवान, आरिफ सुतार,हारून तांबोळी, झहीर शिकलगार,सैफ मुल्ला, मुबीन नदाफ शाहरुख सुतार,तोफिक मुल्ला, रौफ पठाण,मन्सूर तांबोळी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »