गुन्हा

कराड मध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी शिक्षकावर गुन्हा

कराड मध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी
शिक्षकावर गुन्हा
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
मलकापूर(ता.कराड)येथील एका शाळेत अल्पवयीन मुलीला शिक्षकानेच प्रेमाचा प्रस्ताव देऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र कसबे असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित विद्यार्थिनी मलकापूर येथील एका शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेते. 28 जानेवारी रोजी संबंधित मुलगी सकाळी ९.३० वाजता शाळेत असताना शिक्षक राजेंद्र कसबे याने तिला वर्गाबाहेर बोलवले. तसेच तू चार दिवस शाळेत का आली नाहीस?, असे म्हणून कसबे याने संबंधित मुलीला मैत्रीबाबत विचारणा केली. त्यानंतर वारंवार शिक्षक कसबे हा त्या विद्यार्थिनीला वर्गाबाहेर भेटण्यासाठी बोलावत होता. मात्र, भीतीमुळे मुलगी जात नव्हती.
शनिवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगी वर्गात असताना शिक्षक कसबे याने तिला वर्गाबाहेर बोलवले. त्यावेळी भीती वाटल्यामुळे मुलीने तिच्यासोबत तिच्या तीन मैत्रिणींना घेतले. त्या चारजणी वर्गाबाहेर गेल्या. त्यावेळी कसबे याने इतर तीन मुलींना पुन्हा वर्गात पाठवले. तसेच पीडित मुलीला, मी तुला चार दिवस भेटायला बोलवत असताना तू का आली नाहीस? रात्री ३ वाजता व्हाट्सअपवर तू ऑनलाइन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणून मुलीचा हात पकडला. यामुळे
घाबरलेल्या मुलीने हात झटकून तेथून वर्गात पळ काढला.
त्यानंतर घडलेली घटना तिने वर्गमैत्रिणींसह कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी कराड शहर पोलीस ठाणे गाठले. याबाबत रविवारी (दि. १५) कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षक राजेंद्र कसबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »