कराड जवळ कोयना नदीत बुडून एकाचा मृत्यू

कराड जवळ कोयना नदीत बुडून एकाचा मृत्यू
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
कोयना नदीत बुडून एकाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. विक्रम प्रकाश कडव (वय 44) रा. आगाशिवनगर ता. कराड असे नदीत बुडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत नंदकुमार प्रकाश कडव यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विक्रम कडव हे त्यांचे बुधू नंदकुमार कडव यांच्या सोबत आगाशिवनगर येथे राहतात. रविवारी सकाळी 8 वाजता ते घरातून टॉवेल घेवून आंघोळीसाठी गेले, ते परत आले नाहीत. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास येथील जुन्या कोयना पुलानजीक विट भट्टीशेजारी कोयना नदीपात्रात एक पुरूष जातीचा मृतदेह तंरगताना आढळून आला. त्यानंतर हा मृतदेह प्रकाश कडव यांचा असल्याची माहिती त्यांचे बंधू नंदकुमार कडव यांना मिळाली.
घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. तसेच सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.






