श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीकचे हिवाळी परीक्षा 2025 च्या निकालामध्ये उत्तुंग यश

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीकचे हिवाळी परीक्षा 2025 च्या निकालामध्ये उत्तुंग यश
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
यशवंत विद्यापीठ कराड संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेमार्फत घेतल्या गेलेल्या हिवाळी परीक्षा 2025 चा निकाल उत्कृष्टपणे लागलेला आहे. यामध्ये सर्वच विभागाच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी विषेश गुणवत्ताश्रेणी व प्रथम श्रेणी संपादन करुन करुन घवघवीत यश मिळविलेले आहे. या परीक्षेमध्ये अंतिम वर्षातील कॉम्प्युटर इंजिनिअरींगमध्ये थोरात आर्या 98.24, सुर्यवंशी अदित्य 97.29 व मोहिते प्राजक्ता 96.24 टक्के गुण, व्दितीय वर्षामध्ये शेख साकिरुद्दीन 96.82, ढेब श्रुती 91.53 व कोरबु यास्मिन 91.18 टक्के व प्रथम वर्षामध्ये गायकवाड अनुष्का 85.5, नदाफ मोहम्मदिसा 85.29 व सराटे शिवतेज 84.00 टक्के यांनी अनुक्रमे प्रथम व्दितीय व तृतीय कमांक संपादित केले. कॉम्प्युटर विभागामध्ये 95 टक्केपेक्षा जास्त 6 विद्यार्थी, 90 टक्के पेक्षा जास्त 12 विद्यार्थी व विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये 63 विद्यार्थ्यांनी गुण संपादित करुन तंत्रनिकेतनच्या यशामध्ये भर घातली आहे.
इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागामध्ये अंतिम वर्ष शेजळे रितेश 87.88, खटावकर श्रेया 85.29 व सुर्यवंशी शिवराज 79.65 टक्के, व्दितीय वर्षामध्ये शिर्के समिक्षा 86.00, पवार आरती 75.00 व प्रथम वर्षामध्ये बनसोडे किशोरी 77.88, कुंभार आरती 76.71 व शिंदे राजनंदिनी 75.29 टक्के गुण संपादित करुन अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक सपादित केले. आर्किटेक्चर विभागामध्ये अंतिम वर्षामध्ये म्हेत्रे समृध्दी 90.38, पाटील गायत्री 89.13 व शेळके शुभम 88.40 टक्के, व्दितीय वर्ष दिक्षीत क्षिप्रा 80.94, शिंदे ज्ञानेश 75.00 व प्रथम वर्ष निकम आयुष 88.82, घाडगे समृध्दी 85.18 व प्रतिक सोट 81.41 टक्के यांनी अनुक्रमे प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांक संपादित केले.
सिव्हील इंजिनिअरींग विभागामध्ये व्दितीय वर्षामध्ये जाधव तनिष 81.80, वरगर वैष्णवी 80.94 व सलोणकर काजल 77.47, कुंभार आकाश 71.30 व मेकॅनिकल विभागामध्ये सकट आकांक्षा 83.24, यांनीही सुयश संपादन केले.
सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अध्यक्ष श्री. बी.टी. किणीकर सर, सेक्रेटरी श्री. शिरीष किणीकर दादा, प्राचार्य श्री. स्वागत सर. सर्व विभागप्रमुख, प्राद्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.






