प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालय विजयनगर येथे क्रीडास्पर्धा व कलादालनाचे उदघाटन

प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालय विजयनगर येथे क्रीडास्पर्धा व कलादालनाचे उदघाटन
कराड: संतोष शिंदे –
स्व.यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या ४१ व्या पुण्यतिथी निमित्त विजयनगर येथील प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन कलादालनाचे व वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष मा.आ.आनंदरावजी पाटील(नाना) यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी विजयनगरचे सरपंच सौ.अनिता संकपाळ,उपसरपंच मानसिंगराव पाटील दादा, केसे गावचे सरपंच प्रदिप शिंदे, संस्थेचे सचिव प्रतापसिंह पाटील, संचालक ॲड ए.वाय.पाटील साहेब, माजी सरपंच संजय शिलवंत, विश्वासराव पाटील आण्णा,सेवानिवृत्त उपनिबंधक दिलीपराव पाटील,सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि NSG गुरुकुल चे अध्यक्ष रामचंद्र पाटील, हिम्मतराव देसाई,वैभव पाटील,समाधान शिंदे,उत्तम शिंदे,विजयनगरचे ग्रामविकास अधिकारी तसेच विजयनगर,पाडळी, केसे, मुंढे साकुर्डी, तांबवे परिसरातील पालक,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मा.आ.आनंदराव पाटील यांनी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला, तसेच विद्यार्थांनी तयार केलेली वैज्ञानिक उपकरणे, तसेच कार्यानुभव अंतर्गत तयार केलेले साहित्य, विद्यार्थांनी रेखाटलेली चित्रे,रांगोळी प्रदर्शन या माध्यमातून कलागुणांना वाव देण्याचा मुख्य हेतू असून विद्यार्थांनी बनवलेली उपकरणे हे तयार करताना त्यांना शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन पालकांचे सहकार्य मिळाले यामुळे विद्यार्थांचे भविष्य उज्ज्वल होऊन ते स्वत आपली प्रतिमा समाजामध्ये तयार करू शकतात व आपल्या पालकांचे शिक्षकांचे तसेच संस्थेचे नाव सर्व दूर पोहचवण्यात यशस्वी होतील यात काहीच शंका नाही. असेच नवनवीन उपक्रम राबवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे आव्हान करत नानांनी विद्यार्थांचे कौतुक केले. प्रथम यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, क्रीडा ज्योत व लेझीम पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक मारुती चव्हाण सर यांनी तर आभार शंभूराज पाटील यांनी मानले, सूत्र संचालन सारिका वारके मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी पालकांनी अतिशय उत्स्फूर्त पणे सहकार्य केले.






