जीवनशैली

नगराध्यक्षपदासाठी ३, नगरसेवकपदासाठी ५० अर्ज दाखल कराड नगरपालिका निवडणूक; अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत बाकी

नगराध्यक्षपदासाठी ३, नगरसेवकपदासाठी ५० अर्ज दाखल
कराड नगरपालिका निवडणूक; अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत बाकी
कराड: संतोष शिंदे –
कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शनिवार, दि. १५ रोजी नगराध्यक्षपदासाठी ३ आणि नगरसेवक पदासाठी तब्बल ५० अर्ज दाखल झाले असल्याची ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी शरद रामचंद्र देव (अपक्ष), झाकीर मौला पठाण (राष्ट्रीय काँग्रेस) आणि आणखी एक अपक्ष उमेदवार असे एकूण तीन अर्ज दाखल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांतून एकूण ५० अर्ज दाखल झाले आहेत. यात भाजप, काँग्रेस, लोकशाही आघाडी, जनशक्ती आघाडी, तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. काही उमेदवारांनी पक्षीय आणि अपक्ष असे दोन स्वतंत्र अर्जही दाखल केले आहेत.
प्रभागनिहाय अर्जांची माहिती पुढीलप्रमाणे; प्रभाग १ ब : सुदर्शन पाटसकर (भाजप), राहुल पाटील (भाजप), शंतनु पाटसकर (अपक्ष), प्रभाग २ अ : नीलम कदम (भाजप / अपक्ष), पद्मजा लाड (अपक्ष), भाग्यश्री साळुंखे (भाजप), प्रभाग २ ब : सोनाली नाकोड (भाजप), सुहास पवार (लोकशाही आघाडी / अपक्ष), विनायक कदम (भाजप / अपक्ष), प्रभाग ३ अ : सारिका देशमुख (जनशक्ती आघाडी), निकहत नदाफ (अपक्ष), प्रभाग ३ ब : जावेद शेख (अपक्ष), प्रभाग ४ ब : विवेक भोसले (भाजप), प्रभाग ५ अ : अर्चना पाटील (काँग्रेस), प्रभाग ६ अ : सानिया मुतवल्ली (अपक्ष), प्रभाग ७ अ : प्रिया आलेकरी (भाजप / अपक्ष), प्रभाग ७ ब : घनश्याम पेंढारकर (भाजप), विनायक मोहिते (शिवसेना / अपक्ष), जयंत बेडेकर (अपक्ष), प्रभाग ८ अ : तेजस्विनी डुबल (भाजप), प्रभाग ८ ब : संजय चन्ने (भाजप), शैलेंद्र गोंदकर (भाजप), अतुल बारटक्के (भाजप / अपक्ष), प्रभाग १० अ : मनीषा मुळे (भाजप), प्रभाग १० ब : समाधान चव्हाण (भाजप), विनोद चव्हाण (भाजप), प्रभाग ११ अ : वैष्णवी वायदंडे (भाजप / अपक्ष), शुभांगी भोसले (अपक्ष) यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले.
तर प्रभाग ११ ब : अमर यादव (अपक्ष), गणेश पवार (भाजप), अभिषेक भोसले (भाजप), अक्षय सुर्वे (काँग्रेस / अपक्ष), धनश्री पवार (अपक्ष), प्रभाग १२ अ : शितल सूर्यवंशी (अपक्ष), प्रभाग १२ ब : गणेश कापसे (अपक्ष), जय सूर्यवंशी (अपक्ष), अजय सूर्यवंशी (अपक्ष), प्रभाग १३ ब : आशुतोष डुबल (भाजप), गिरीश शहा (भाजप), शिवराज कोळी (भाजप), सिद्धांत पाटील (अपक्ष), प्रभाग १५ ब : विश्वनाथ फुटाणे (भाजप), अकिल आंबेकरी (काँग्रेस) या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे आणि सहाय्यक अधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे दाखल केले.
रविवारीही अर्ज दाखल करण्याची सुविधासाधारणपणे सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जात नसले तरी, निवडणूक आयोगाच्या विशेष सूचनेनुसार उद्याचा रविवारही अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »