जीवनशैली

कराड पालिका निवडणुकीसाठी ६ उमेदवारांचे ८ अर्ज नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज नाही; आजअखेर ७ उमेदवारांचे एकूण ९ अर्ज दाखल

कराड पालिका निवडणुकीसाठी ६ उमेदवारांचे ८ अर्ज
नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज नाही; आजअखेर ७ उमेदवारांचे एकूण ९ अर्ज दाखल
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
कराड नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवार, दि. १३ रोजी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी उमेदवारांचा उत्साह वाढला असून, तब्बल ६ उमेदवारांनी ८ अर्ज दाखल केले. बुधवारी दाखल झालेल्या एका अर्जासह आतापर्यंत ७ उमेदवारांचे एकूण ९ अर्ज दाखल झाले असून, आजअखेर नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
पहिल्या तीन दिवसांत संथ प्रतिसाद मिळाल्यानंतर चौथ्या दिवशी उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. सर्व उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सादर केले.आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये प्रभाग ३ अ मधून सर्वाधिक तीन अर्ज दाखल झाले. यामध्ये सर्वसाधारण महिला गटातून रजनी अधिकराव पवार यांनी अपक्ष एक आणि शिवसेनेकडून दोन अशा तीन उमेदवारी अर्ज सादर केले. तसेच प्रभाग ३ ब मधून सर्वसाधारण गटातून साहेबराव रवींद्र शेवाळे (अपक्ष), प्रभाग ७ अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून अंजली नथुराम कुंभार (भाजप), प्रभाग ८ ब मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून संजय चंद्रकांत चन्ने (अपक्ष), प्रभाग १४ अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून वर्षा सचिन वास्के (भाजप) आणि प्रभाग १४ ब मधून सर्वसाधारण गटातून शिवाजी पांडुरंग पवार (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत (रविवार वगळता) सकाळी ११ ते दुपारी २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. मतदान २ डिसेंबरला, तर मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे हे निवडणूक निर्णय अधिकारी असून, रोहिणी शिंदे व प्रशांत व्हटकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »