कराडच्या वाखाण परिसरात पाच ठिकाणी घरफोडी

कराड शहरातील वाखाण परिसरात पाच ठिकाणी घरफोडी
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
शहरातील वाखाण परिसरात पाच ठिकाणी घरफोडीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एका घरातून रोख रक्कम, सोन्यासह चांदीच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. दरम्यान, चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची मोडतोड केल्याचे समोर आले आहे. तसेच रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याने अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
वाखाण परिसरातील धनंजय जोशी यांच्या घरातून 22 हजार रोख रक्कम, 7 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दीडशे ग्रॅम चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. तानाजी चव्हाण यांच्या बंद घरात चोरीचा प्रयत्न झाला आहे. कैलास कदम यांच्या बंगल्याचा पहिला मजल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात शिरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याशिवाय अन्य दोन घरात चोरीचा प्रयत्न झाला. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात पाथरी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्यामुळे सविस्तर मजकूर समजू शकला नाही.






