जीवनशैली

कराड बसस्थानक पुणे विभागात तिसरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान; क गटात मेढा प्रथम, म्हसवड तृतीय

कराड बसस्थानक पुणे विभागात तिसरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान; क गटात मेढा प्रथम, म्हसवड तृतीय
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत एसटी महामंडळाने दुसऱ्या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर केला. त्यात पुणे विभागात अ वर्ग बसस्थानकात कहऱ्हाड आगाराने तृतीय क्रमांक पटकावला. क गटात जिल्ह्यातील मेढा आगाराने प्रथम, तर म्हसवड बसस्थानकाने तृतीय क्रमांक पटकावला. हे अभियान एसटी बसस्थानकांना स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी राबवले जाते.
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांची वाहतूक खासगी प्रवासी वाहतुकीपेक्षा चांगली व्हावी, प्रवाशांना बसस्थानक आवारात आल्यावर स्वच्छ वातावरणात थांबता यावे, या हेतूने महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवले जात राज्यातील ५८० बसस्थानकांत हे अभियान राबविण्याची कार्यवाही हाती घेतली. ही स्पर्धा शहरी विभाग अ वर्ग, निमशहरी विभाग ब वर्ग, ग्रामीण विभाग क वर्ग यानुसार घेण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर व नागपूर, अमरावती अशा सहा प्रादेशिक विभागांत ही स्पर्धा झाली. त्यात शहरातील मुख्य बसस्थानक, गावागावांतील बसस्थानकांची स्वच्छता व सुशोभीकरण याचा समावेश केला होता. त्याअंतर्गत राज्यातील २५० आगारांतील अ वर्गातील १४७ बसस्थानकांच्या समितीने नुकतीच पाहणी केली. त्यात येथील बसस्थानकाचीही पाहणी मुंबईच्या विभागीय समितीने केली होती. समितीने येथील बसस्थानकातील स्वच्छता, रंगरंगोटी, प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या सेल्फी पॉइंट, वाहतूक नियंत्रक कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष,प्रवासी आरक्षण कक्ष, पुरुष व महिला स्वच्छतागृह, चालक- वाहक विश्रांतीगृह, आरक्षण खिडकी, पास विभाग, चौकशी खिडकीची पाहणी करून गुणांकन दिले. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. यापुढे आता राज्यस्तरीय सर्वेक्षणासाठी स्पर्धा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »