
प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क
विजयनगर येथील प्रेमलाकाकी चव्हाण माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) व ऍड.ए.वाय.पाटील संस्थेचे सचिव प्रतापसिंह पाटील तसेच सुपने पी एच सी चे कर्मचारी तसेच शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रथमता प्रतिमेची पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पाटील नाना यांनी लोकमान्य टिळक यांनी विद्यार्थी दशेपासून स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्य चळवळ तसेच आपल्या शाहिरीच्या माध्यमातून लोक जागृती कशी केली तसेच ते स्वतः अशिक्षित असूनही त्यांनी लिहिलेले पोवाडे नाटक, चित्रपटाच्या, कथा कादंबरी याची माहिती दिली तसेच यावेळी ऍड.ए.वाय पाटील व प्रतापसिंह पाटील यांनी मार्गदर्शन केले तर आभार विद्यालयाचे मुख्यध्यापक चव्हाण सर यांनी मानले.