श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक येथे तृतीय कॅप फेरीव्दारा प्रवेशाची सुवर्णसंधी
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक येथे तृतीय कॅप फेरीव्दारा प्रवेशाची सुवर्णसंधी

कराड पॉलिटेक्नीक येथे तृतीय कॅप फेरीव्दारा प्रवेशाची सुवर्णसंधी
कराड: ग्राम दौलत नेटवर्क –
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक, कराड हे तंत्रनिकेतन १९८३ सालापासून कराडमध्ये सुरु आहे. येथे डिप्लोमा कॉम्प्युटर, आकिटेक्चर, इलेक्ट्रीकल, सिव्हील व मेकॅनिकल इंजिनिअरीग हे अभ्यासक्रम सुरु आहेत.
सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत डिप्लोमा इंजिनिअरींग प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून, दोन राऊंडची प्रवेश प्रक्रिया संपली आहे, तर तृतीय फेरीसाठी संचालनालयाच्या वेळापत्रकानुसार ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत दि. २७ जुलैपर्यंत आहे. ऑप्शन फॉर्म भरताना मायनॉरिटी स्टेटसमध्ये मायनॉरिटी व नॉन मायनॉरिटी पर्याय असतात. कॉलेजचे व कोर्सचे नाव सिलेक्ट करण्यासाठी दोन्ही पर्यायावर क्लिक करावे. प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रनिकेतनवा डीटीई कोड नं. ६४७५ हा आहे.
पॉलिटेक्नीकमध्ये जैन अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या ५१ टक्के जागा तृतीय फेरीमध्ये सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या आहेत. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून एम.एस ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले तंत्रनिकेतनचे प्राचार्य स्वागत किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रनिकेतनची शैक्षणिक गुणवत्ता अव्वल स्थानावर पोहोचली आहे. तंत्रनिकेतनला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळानेही सर्व कोर्सेससाठी २०२५ मध्ये अतिउत्कृष्ट ग्रेडेशन दिलेले आहे. तंत्रनिकेतनने उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली असून, उन्हाळी परीक्षा २०२५ मध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी निकालामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले आहे. तसेच अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांनी किर्लोस्कर ऑईल, जॉन डिअर, फिनीक्स मेकॅनो इ. नामांकित कंपन्याचे तंत्रनिकेतनमध्ये आयोजित प्लेसमेंट ड्राईव्हमधून प्लेसमेंट मिळविलेली आहे. कॅप फेरीमधून प्रवेशीत सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाचे नियमाप्रमाणे स्कॉलरशीप उपलब्ध आहे. तरी प्रवेश प्रक्रिया व अन्य माहितीसाठी विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनमध्ये संपर्क साधावा व आपला प्रवेश निश्चित करुन आपले भविष्य उज्वल करावे, असे आवाहन सेकेटरी शिरीष बी. किणीकर व प्राचार्य स्वागत किणीकर यांनी केले आहे.