श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून अतिउत्कृष्ठ ग्रेड प्रदान

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून अतिउत्कृष्ठ ग्रेड प्रदान
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क-
यशवंत विद्यापीठ कराड संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराड हे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद न्यु दिल्ली मान्यताप्राप्त तंत्रनिकेतन कराड येथे 1984 पासून सुरु आहे. तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर, इलेक्ट्रीकल, सिव्हील, मेकॅनिकल इंजिअिनरींग व डिप्लोमा आर्किटेक्चर हे कोर्सेस सुरु आहेत.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचेमार्फत प्रतिवर्षी राज्यातील सर्व तंत्रनिकेतनांचे आवेक्षण करुन ग्रेडेशन दिले जाते. यासाठी मंडळामार्फत विविध निकष तथा नियमावली करणेत आलेली आहे त्यानुसार मंडळामार्फत बाहय कमिटी मार्फत तंत्रनिकेतनांना भेटी देवून निकषानुसार प्रत्यक्ष पडताळणी करुन मंडळामार्फत सदरहू ग्रेडेशन दिले जाते. यामध्ये पायाभुत सुविधा, दर्जेदार शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांचे निकाल, प्लेसमेंट इत्यादी बाबींचे परीक्षण केले जाते. मंडळामार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी तंत्रनिकेतनला अतिउत्कृष्ठ ग्रेडेशन देणेत आलेले आहे. सदरहू ग्रेडेशन प्राप्त करणेसाठी तंत्रनिकेतनचे प्राचार्य स्वागत सर यांचे मार्गदर्शनाखाली सर्व डिपार्टमेंटसचे विभागप्रमुख अधिव्याख्याते व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदरहु ग्रेडेशन प्राप्त झालेबद्दल प्राचार्य व सर्व स्टाफचे संस्थेचे सेक्रेटरी श्री. शिरीष किणीकर दादा, संस्थापक श्री. बी.टी. किणीकर सर यांनी अभिनंदन केले आहे व पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत.