
डॉ.दिलीप सोलंकी यांच्या दवाखान्याचे स्थलांतर
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
येथील प्रख्यात फिजीशियन डॉ. दिलीप सोलंकी यांच्या दवाखान्याचे स्थलांतर शनिवार पेठेतील पाटण कॉलनीत करण्यात आले आहे. स्थलांतरित दवाखान्याचा शुभारंभ नुकताच सोलंकी कुटुंबीय व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या दवाखान्याची ओपीडी रोज सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत सुरू असणार आहे. डॉ. दिलीप सोलंकी यांच्याकडे उपचार घेणारे असंख्य नागरिक आहेत. मलकापूर – शास्त्रीनगर येथे यापूर्वी डॉ. सोलंकी यांचा दवाखाना सुरू होता. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी हा दवाखाना पाटण कॉलनी येथे सुरू करण्यात आला आहे. डॉ. सोलंकी हे सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. कोरोना काळात त्यांनी सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सेवा दिली होती. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.
संजीवन हॉस्पिटलचे डॉ. विजयसिंह पाटील, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मोहन शिंगाडे, प्रताप पाटील, संजय ओसवाल, संताजी जाधव, धनंजय कोळी, गोरख तावरे, सचिन देशमुख, देवदास मुळे, विश्वास पवार, गिरीश पाटील, निवासराव खबाले, इरफान कच्छी, शंकरराव जाधव, दिनेश पोरवाल,
भास्कर देसाई, डॉ. सुमित शिंदे, अनिल खुंटाळे, नितीन सोलंकी यांच्यासह शहरातील मान्यवरांनी दवाखान्यास भेट देऊन डॉ. दिलीप सोलंकी यांना शुभेच्छा दिल्या.