
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
कराड:ग्राम दौलत न्यूज नेटवर्क –
यशवंत विद्यापीठ कराड संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराड येथे दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता किर्लोस्कर ऑईल इंजिन लि. या कंपनीमार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करणेत आलेले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रानिक्स व मेकॅट्रानिक्स इंजिनिअरींग अंतीम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची संधी उपलब्ध होणार आहे.
तंत्रनिकेतनमध्ये चालु शैक्षणिक वर्षामधील हा तिसरा रोजगार मेळावा होणार आहे. यापुर्वीही अनेक विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. तरी जिल्हयामधील पात्र विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यासाठी नाव नोंदणीसाठी https://forms.gle/09fGTkYqS6xf5DMC9 या गुगल लिंकवर आपली नोंदणी करावी व सदर मेळाव्यास हजर राहून या संधीचा लाभ घ्यावा व आपले भवितव्य उज्वल करावे असे आवाहन तंत्रनिकेतनमार्फत प्राचार्य श्री. स्वागत सर यांनी केलेले आहे.